Hot Posts

6/recent/ticker-posts

अक्कलकोट नगरपरिषदेचे रोखपाल प्रकाश लिगाडे यांचा सत्कार

 अक्कलकोट नगरपरिषदेचे रोखपाल प्रकाश लिगाडे यांचा सत्कार


अक्कलकोट  (काटूसत्य वृत्त):- 
येथील नगरपरिषदेचे रोखपाल प्रकाश लिगाडे यांचा सेवापूर्ती समारंभ मंगरुळे फंक्शन हॉल येथे सन्मानपूर्वक पार पडला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते लिगाडे यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, बसलिंगप्पा खेडगी, प्रदीप पाटील, अश्पाक बळोरगी, विनायक येवले, नवनाथ शिंदे, नितीन शेंडगे, शुभम माने, चंद्रकांत धेंडे, शिवरत्न पंडित, राजेंद्र हत्ते, शिवशरण खुबा, विठ्ठल तेली, अमित बनसोडे, सरोजा लिगाडे, लेखाधिकारी विशाल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. लिगाडे यांनी नगरपरिषदेच्या विविध पदांवर तब्बल ३५ वर्षे सेवा बजावत असताना रोखपाल पदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेने पार पाडली. अधिकारी-कर्मचारी
तसेच शहरातील नागरिकांशी सतत संवाद साधत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि
कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कामात प्रामाणिकपणा, निःस्वार्थ वृत्ती आणि सेवाभाव
सातत्याने दिसून आला, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. लिगाडे यांचा हा सन्मान त्यांच्या प्रदीर्घ सेवेला, निष्ठेला आणि कर्तव्यपरायणतेला दिलेली एक पोचपावती असल्याचे मत मान्यवरांनी नमूद केले. त्यांच्या कार्यपद्धतीतून आजच्या तरुण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, असेही मनोगत या सोहळ्यात करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments