Hot Posts

6/recent/ticker-posts

........पानीपत ......

 ........पानीपत ......


अडिचशे वर्षे लपविला ईतिहास 

केला कलमबहाद्दरांनी अट्टाहास

अटकेपार झेंडे त्यांनी लाविले

अन् पानीपतमध्ये मराठे हरले  !!१!!


अखेरच्या श्वासापर्यंत लढले मराठे

शिवरायांचे स्वप्न सत्यात उतरविण्या

अटकेपारही गेले ते शिंदे-होळकर

स्वराज्याचा भगवा फडकविण्या !!२!!


आमचा रक्ताचा ईतिहास शाईने पुसला

विजय-पराभवाचा वाटा सोयीस्कर केला

सव्वा लाख मराठ्यांचा नरसंहार केला

म्हणू तिळ-गुळ घ्या अन् गोड बोला !!३!!


धुंदीत,मस्तीत,नशेत जगले पेशवे

स्वाराज्याच्या ईमानी लढले मराठे

तलवारीच्या धारेवर लढलेे मराठे

पण पुस्तकात नोंदवायला कमी पडले मराठे !!४!!


अटकेपार लावले झेंडे मराठ्यांनी

पानीपतही शौर्याने मराठ्यांनी जिंकले

युध्दात जिंकलेले मराठे नेहमीच

लेखणीत जानवेधा-यांवर विसंबले !!५!!


आमच्या लाखो बांधवांना आले हौतात्म्य

शेवटच्या श्वासापर्यंत लढले मातीसाठी

आजही तयार आहोत लाखोंच्या संख्येने

बलिदान देण्या नितीसाठी-पानीपतासाठी !!६!!


सचिन जगताप

९६९६९६९५५८

९८९००४७५५८

Reactions

Post a Comment

0 Comments