" एकता" महिला मंच आयोजित मकर संक्राती निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न
बार्शी (कटूसत्य वृत्त):- आण्णा सावळे सभागृह बार्शी येथे एकता महिला मंचच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती छाया जालिंदर नालकुल मॅडम, व सहहायक पोलीस उपनिरीक्षक सिंधू देशमुख यांचा सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला.त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती छाया जालिंदर नालकुल मॅडम यांनी उपस्थित महिलांना एकता महिला मंचच्या माध्यमातून मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे अतिशय सुंदरपणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तसेच एकता महिला मंचच्या माध्यमातून असे नेहमीच महिलांसाठी कार्यक्रम राबविले जावेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर सहहायक पोलीस उपनिरीक्षक सिंधू देशमुख यांनी उपस्थित महिलांना बोलताना म्हणाल्या की एकता महिला मंचच्या माध्यमातून महिलांसाठी नेहमीच रोजगाराच्या अनुषंगाने असेल किंवा महिलांच्या संदर्भात कोणतेही प्रश्न असतील ते हाती घेऊन महिलांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत असून महिलांना एक हक्काचे मंच उपलब्ध करून दिले आहे एकता महिला मंचच्या माध्यमातून असे नेहमीच कार्य घडत राहो हीच सदिच्छा तसेच अशाच कार्यक्रमामुळे महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असून त्यांच्यामध्ये धाडसी वृत्ती निर्माण होत आहे तसेच महिलांच्या विविध विषयावरती त्यांनी मार्गदर्शन केले .यावेळी कार्यक्रमदरम्यान शहीद रामेश्वर काकडे यांची पत्नी रोहिणी काकडे ह्या देखील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या त्यांना उपस्थित महिला मान्यवरांच्या वतीने हळदी कुंकू लावून, तीळ गूळ देण्यात आले, तसेच या कार्यक्रमादरम्यान एकता महिला मंचच्या सदस्यांनी उखाणे घेत,सेल्फी पॉइंट जवळ एकमेकींना हळदीकुंकू लावत,तिळगुळ देत हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित छाया जालिंदर नालकुल , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिंधू देशमुख,डॉ शीतल बोपलकर वैद्यकीय अधीक्षिक ग्रामीण रुग्णालय बार्शी, तसेच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन /नियोजन केले होते ते एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर, तसेच एकता महिला मंचच्या शालन दसवंत, वनिता जगझाप, लक्ष्मी सुतार, सुशीला सोनवणे, नूरजहाँ शेख, हेमा कावरे, उज्वला चव्हाण,सोनाली कोळी, मैना सोनवणे शितल काजळे महादेव माने कोमल वायकर,रत्नमाला कोळी, वनमाला कोळी,कोकिळा जंगले, राजेश्री घोलप, आरती जाधव तसेच एकता महिलांच्या सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शीतल सुरवसे यांनी केले
0 Comments