Hot Posts

6/recent/ticker-posts

'उत्तर' ची फेरमतमोजणी तूर्त लांबणीवर

 'उत्तर' ची फेरमतमोजणी तूर्त लांबणीवर


न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष : महेश कोठेंची होती मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानावर आक्षेप घेत दिवंगत महेश कोठे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी निवडणूक कार्यालयाकडे ९६ हजार रुपये ही भरले होते. त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या समक्ष दोन मतदान केंद्रावरील मतांची फेरमोजणी होणार होती. तशी तयारी निवडणूक कार्यालयाने केली होती. आता अर्जदार महेश कोठे यांचे निधन झाल्याने तूर्त फेर मतमोजणी प्रक्रिया होण्याची शक्यता कमी आहे.
ईव्हीएमवर झालेल्या मतदानाबाबत कोठे यांनी न्यायालयातही याचिका दाखल केली होती. त्यामुळे, या संदर्भात न्यायालय काय निर्णय देईल, याकडे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निन्हाळी यांनी सांगितले, मतमोजणीनंतर ७ दिवसाच्या आत महेश कोठे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. रीतसर त्यांनी पैसेही भरलेले होते. पैसे भरल्याची पावती आणि अर्ज आमच्याकडे दाखल केली. त्यांचे अर्ज आम्ही आयोगाकडे निवडणूक पाठवला होता. मतमोजणीनंतर ४५ दिवसांपर्यंत उमेदवारांना न्यायालयात याचिका दाखल करता येतो. त्यामुळे, या ४५ दिवसांची वाट पाहून फेर मतमोजणी
करण्याचा नियम आहे. कोठे यांनी न्यायालयातही याचिका दाखल केली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, अर्जदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत
शरद पवार यांच्याशी मुंबईत झाली होती चर्चा कोठे यांनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमच्या मतदान तसेच मतमोजणीवर आक्षेप घेतला होता. या संदर्भात शरद पवार यांनी मुंबईत बैठक घेतली होती. पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून आदेश मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती.
न्यायालयातही तक्रार केली असेल तर न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत फेर मतमोजणी करता येणार नाही. तरी आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. अभ्यास करत आहोत..
Reactions

Post a Comment

0 Comments