औषधनिर्माणशास्त्रामध्ये भविष्यातील विविध संधी- डॉ. निलेश चौगुले
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर, टेंभुर्णी येथे बी. फार्मसी फार्मसी विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्रामध्ये भविष्यातील विविध संधी यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. निलेश चौगुले प्राचार्य एमआयपी अम्बाप कोल्हापूर यांनी या व्याख्यानात औषधनिर्माणशास्त्राच्या भविष्यातील संधी आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर यावर सखोल विचार मांडला. त्यामध्ये प्रमुख मुद्दे म्हणजे: नवीन औषधांची निर्मिती - औषधनिर्माण शास्त्राच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर, जसे की जीन थेरपी, बायोटेक्नॉलॉजी, आणि आण्विक संशोधन. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीचा वापर - औषध निर्माण प्रक्रियेतील डेटा विश्लेषण, अॅनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर. सस्टेनेबल औषधनिर्माण - पर्यावरणाचा विचार करून औषधनिर्मिती, ज्यामुळे औषधांच्या उत्पादनातील कचरा कमी होईल आणि पर्यावरणावर कमी परिणाम होईल. वैश्विक आरोग्य संकटाचे समाधान - COVID-19 सारख्या जागतिक आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर औषधनिर्माण शास्त्रात आढळलेल्या नवीन संधी.
डॉ.निलेश चौगुले यांच्या या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध मार्गदर्शन करण्यात आले. त्याच्या मदतीने औषधनिर्माण शास्त्रात होणाऱ्या बदलांसह, भविष्यातील संधींचा शोध घेण्याचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नामदेव शिंदे यांनी केले.
याप्रसंगी डॉ. प्रशांत मिसाळ, प्रा. शिवराज ढगे, आदी शिक्षक उपस्थित होते. प्राचार्य डॉ. रुपाली बेंदगुडे, संस्थापक सचिव प्रा.डॉ. रवींद्र बेंदगुडे यांनी थोडक्यात मुलांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष अँड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
0 Comments