एलिमेंटरी परीक्षेत शौर्या काळे हिचे यश
पोखरापूर(कटूसत्य वृत्त):- मोहोळ येथील नागनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शौर्या गिरमलेश्वर काळे हिने एलिमेंटरी ग्रेड ड्रॉईंग परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत १९ वा आणि स्मरण चित्र या विषयात आठव्या क्रमांकाने येण्याचा बहुमान पटकावला. पाच राज्यातून सुमारे ७ लाख ऐंशी हजार विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होते. काळे हिने मिळवलेल्या यशाने नागनाथ विद्यालयाबरोबरच संपूर्ण तालुक्याची मान उंचावली आहे. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक बशीर बागवान यांच्या हस्ते शौर्या काळे हिचा सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक कलाशिक्षक दिलीप दीक्षित, उपप्राचार्य पी. एस. शिंदे, प्रा. संभाजी चव्हाण, प्रा. माळी, प्रा. साळुंखे, मनोज ठोंबरे आदी उपस्थित होते.
0 Comments