दक्षिण सोलापूर तालुक्याच्या २४ शिक्षक आदर्श पुरस्कारांनी सन्मानित
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंचायत समिती दक्षिण सोलापूर शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील २४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात आ. सुभाष देशमुख, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते २४ शिक्षकांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन आदर्श शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार यांनी प्रास्ताविकेत तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा व विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा यासंबंधीचे माहिती सांगून येत्या शैक्षणिक वर्षात सर्व शाळेत परसबाग व वृक्ष लागवडीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.गटविकास अधिकारी कवितेके म्हणाले, तालुक्यातील शैक्षणिक कार्य समाधानकारक असून शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.आ. सुभाष देशमुख म्हणाले , तालुक्यातील सर्वच शाळेत सर्व भौतीक सुविधा उपलब्ध करुन देणार असून यापुढे शाळेत शिक्षकांना व विध्यार्थ्यांना शाळेत आल्यावर प्रसन्न वाटावे असे चांगली शाळा व परिसर तयार करण्यात येईल. शाळेत परसबाग तयार करुन विद्यार्थ्यांना शेती कामाची माहिती द्यावी.नविन शैक्षणिक वर्षात आमदार फंडातून सर्व विध्यार्थ्यांना ७७००० वह्या वाटप केले जातील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली रणदिवे यांनी केले तर देविदास वाघमोडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी गुरूबाळ सणके यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख व बी.आर.सी. स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
0 Comments