Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी शिक्षण संकुलात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नेताजी शिक्षण संकुलात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात मराठी प्राथमिक शाळा, इंग्लिश मिडीयम स्कूल, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले, प्राचार्य  रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, पालक शिक्षक संघटनेचे सहसचिव बुडप्पा चिकनी, उपाध्यक्षा लक्ष्मी चिलवेरी, माता पालक संघाच्या सदस्या उमा केंचगुंडी, कल्पना जीबटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी गौरी रॅका यांना आदर्श माता पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्य गीत, ध्वज गीत, संविधान, संचलन,कवायत,दिन विशेष, स्फूर्ती गीत, विद्यार्थ्यांचे भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम अशा क्रमाने कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडली.खाऊ वाटपाची कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थ्यांनी देश आमुचा महान,संविधानवर नाटिका,ओ देश मेरे शान पे सदके,जयस्तुते, मेरी कर्मा तू मेरी धर्मा आदी विविध देशभक्तीपर स्फूर्ती गीत सादर केले. श्रीधर बत्तुल, साईकुमार केंचगुंडी,लखन मिठ्ठा,मोहित सिरसुल्ला, श्रावणी सिरसुल्ला, आराध्य जमादार, मनीषा चिरमाडे,श्राव्या नडगेरी, आदित्य बिराजदार, समृद्धी कुडक्याल,श्रुती मोरे,सुप्रिया अलदी,तनुजा चिरमाडे,कीर्ती निलगार,हरिप्रिया चिप्पा,सौम्या लगशेट्टी, लक्ष्मी आडम,प्रतीक्षा हंचाटे, शुभम सरवदे,उमा बिटला,रक्षिता सुकंनपल्ली, सत्यभामा काळे,यशोदा पुजारी, निशा मुसळे,अंकिता कस्तुरी व अथर्व कोल्हापूरे आदी या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर  शिवानंद पुजारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments