Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी नगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास भेट

 छत्रपती संभाजी नगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास भेट




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी नगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास भेट दिली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे स्वागत केले. या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी शहाजहान तांबोळी, मंदिर समितीचा सुरक्षा विभागाचे सहाय्यक  पोलिस निरीक्षक बोरकर  , पंचायत समिती पंढरपूर चे वरिष्ठ सहाय्यक  महेश वैद्य, संदीप आटकले , मंदिर समितीचे सुधीर घोडके, जनसंपर्क अधिकारी अमित नवले , उपस्थित होते.
छत्रपती संभाजी नगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून काम पाहिले होते. सोलापूर जिल्हा  परिषदेचे जिजाऊ जयंती च्या कार्यक्रमा साठी आले असता त्यांनी पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल मंदिरास भेट देऊन चांगल्या कामांची पाहणी केली.
Reactions

Post a Comment

0 Comments