राजमाता जिजाऊ यांची दूरदृष्टी अंगिकारणे ही काळाची गरज- प्रा नवनाथ भोसले
कोंडी (कटूसत्य वृत्त):- जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश मिडियम स्कूल, कोंडी येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रथम माता जिजाऊच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. नवनाथ भोसले ,प्राचार्या सुषमा नीळ, मुख्याध्यापक वैभव मसलकर, अर्चना औराद, महादेवी माने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जिजामातांच्या कार्याची माहिती सांगितली. तसेच राजमाता जिजाऊचा जीवनप्रवास,पोवाडा यांचे सादरीकरण करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी माँसाहेब जिजामातांच्या वेशभूषा करून आल्या होत्या.यावेळी प्रा. नवनाथ यांनी जिजामातांची दूरदृष्टी कशी होती याविषयी मार्गदर्शन केले.तर महादेवी माने यांनी शिवबा जन्माला येण्याआधी माता जिजाऊ जन्माला येणे किती गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.
याकार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्नेहा व्यवहारे यांनी केले तर आभारप्रदर्शन पूनम पोतदार यांनी केले.
0 Comments