Hot Posts

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं किसन जाधवांनी दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं किसन जाधवांनी दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांनी मुंबई येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानी मकर संक्रात निमित्त त्यांची भेट सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची प्रतिमा,शाल, पुष्पगुच्छ,तिळगुळ वड्या देऊन त्यांचा सत्कार करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांचा देखील मकर संक्रात निमित्त सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, विक्रांत उर्फ गजू शिंदे, दीपक आरगेल, महादेव राठोड, लतीफ तांबोळी आदींचे उपस्थिती होते दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी देखील किसन जाधव,नागेश गायकवाड यांच्यासह सोलापूर शहर जिल्हावाशियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान 18 आणि 19 जानेवारी छत्रपती संभाजी नगर येथे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते परंतु आता हा मेळावा 18 व 19 जानेवारी रोजी शिर्डी येथील पुष्पक हॉटेल येथे दोन दिवशीय मेळाव्याचे नियोजन करण्यात करण्यात आले या मेळाव्यात राज्यातील खासदार,आमदार, जिल्हाध्यक्ष,शहराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे विशेष निमंत्रित सदस्य आणि पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे या मेळाव्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.यावेळी सोलापूर शहरातील विविध विकास कामांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांच्या समवेत चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य राहणार असल्याची ग्वाही यावेळी अजित पवारांनी किसन जाधव यांना दिली. तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रिस नाईकवाडी यांचे देखील भेट घेऊन मकर संक्रांति निमित्त तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments