Hot Posts

6/recent/ticker-posts

वडाचीवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द - रणजितसिंह शिंदे

 वडाचीवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द - रणजितसिंह शिंदे




माढा (कटूसत्य वृत्त):- वडाचीवाडी ग्रामपंचायत, पाणी फाउंडेशन टीम व ग्रामस्थांच्या एकजुटीतून गावाने विविध बक्षीसे जिंकून जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे.त्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी माजी आमदार बबनराव शिंदे व मी शासनाच्या विविध योजनांमधून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबध्द असल्याचे सांगून बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील चार गावांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे मिळणाऱ्या पाण्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील आवर्तनात या गावांना नक्कीच पाणी मिळेल असे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.

ते वडाचीवाडी (अं.उ.) ता.माढा येथील आमदार बबनदादा शिंदे ऑक्सिजन पार्कमध्ये माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून डिपीडीसीमधून मंजूर केलेल्या 35 लाख निधीतून उभारण्यात येणाऱ्या भव्य फंक्शन हॉलच्या भूमिपूजनाच्या वेळी बोलत होते.

यावेळी चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी पाच एकर ओसाड माळरानावर सुमारे 14 हजार वृक्षांचे संवर्धन करुन पर्यावरण संवर्धनासाठी तयार केलेल्या ऑक्सीजन पार्क व मियावाकी जंगलाची पाहणी केली.बार्शी उपसासिंचन योजनेतून बंदिस्त पाईपलाईनद्वारे सुरू असलेल्या कामाची पत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवरून फोन करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या.

यावेळी रणजितसिंह शिंदे यांनी पदाधिकारी, ग्रामस्थ,युवक व शेतकरी यांच्यासमवेत दिलखुलास व मनसोक्त गप्पागोष्टी केल्या.त्यांचे प्रश्न,समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या.सर्व सभासद शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप केले जाणार असल्याचे सांगून भविष्यात जनतेचे प्रश्न व समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.

-चौकट - यावेळी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचा व विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक यांना महाराष्ट्र राज्य कृती समितीचा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व माढा प्रेस क्लबच्या नूतन कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र गुंड सर यांचा वडाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रमेश भोईटे व पाणी फाउंडेशनचे प्रणेते मार्तंड जगताप यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सरपंच रमेश भोईटे, पाणी फाऊंडेशनचे प्रणेते मार्तंड जगताप,माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद, तात्यासाहेब भोईटे,अमोल उमाटे,नितीन कदम,विलास कौलगे,रमेश उमाटे,रवींद्र चव्हाण,राजाभाऊ लवटे,किरण चव्हाण,सुधाकर मस्के,पांडुरंग कौलगे,अविनाश कदम,अरुण माने,पप्पू कौलगे,बंडू भोरे,वैभव कौलगे,गोरख थोरे,रोहीदास जाधव,जाफर पटेल,आप्पा पवार,अनिल क्षीरसागर,गणेश भोईटे,बिपिन कदम,भारत मुळे,श्रीमंत कौलगे,आश्रम भोईटे,मानसिंग जगताप यांच्यासह समस्त ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments