जयहिंद विद्यालय येथे स्कूल कनेक्ट संपर्क अभियान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 16, 2025

जयहिंद विद्यालय येथे स्कूल कनेक्ट संपर्क अभियान

 जयहिंद विद्यालय येथे स्कूल कनेक्ट संपर्क अभियान




कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, क. तडवळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट संपर्क अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आलेले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य गाढवे आर.डी.सर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव काळे महाविद्यालयाचे ढोकी चे प्राचार्य डॉ. हरिदास फेरे लाभले तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.डॉ.बालासाहेब मैंद,प्रा.डॉ.इंगळे पी.पी.व प्रा.डॉ.देशमुख बी.एन.सर उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 12 वी तील विद्यार्थिनी प्राची कोरे यांनी केले.प्रा.डॉ.इंगळे प्रस्तावना केली.कार्यक्रमांमध्ये जिल्हास्तरीय  आट्यापाट्या, 4×100 मी.रीलेव 4×400 मी.रीले स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे  मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी वसंतराव काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास फेरे सर यांनी एन.इ.पी. म्हणजे *"राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020"या अंतर्गत विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणाच्या सुविधा, रोजगार व उद्योगधंद्यासाठी शैक्षणीक धोरण कसे उपयुक्त आहे हे सांगितले .यावेळी प्रा.डॉ.बालासाहेब मैंद,प्राचार्य गाढवे आर. डी.यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी आभार प्रा.पठाण आय.एल.यांनी मांनले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व प्राध्यापिका व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages