संपत्तीचे वारसदार होण्यापेक्षा सुसंस्काराचे वारसदार बनणे श्रेष्ठ-पद्मजादेवी मोहिते-पाटील
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, या हेतूने तालुक्यातील सर्व संस्थांची सहकार तत्त्वावर उभारणी केली. आज त्यांच्या विचारांचा वारसा चालविण्याची गरज आहे.
संपत्तीचे वारसदार होण्यापेक्षा सुसंस्काराचे वारसदार बनणे कधीही श्रेष्ठ असल्याचे मत संस्थेच्या मार्गदर्शका सोलापूर विद्यापिठाच्या सिनेट सदस्य पद्ममजा देवी मोहिते - पाटील यांनी व्यक्त केले.
त्या नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात सहकार महर्षी यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकारांचा सन्मान व क्रीडा स्पर्धेचे आयोजन या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी
प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य डॉ चंद्रकांत कोळेकर, प्र प्राचार्य डॉ. रज्जाक शेख, पत्रकार सुनील राऊत, लतिब नदाफ, निनाद पाटील, एन. के. साळवे, अभिमन्यू आठवले,श्रीकांत बाविस्कर, मनोज राऊत,समीर सोरटे, सुनील गजाकंस, सुनील ढोबळे, संजय पवार हे उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते प्रत्रकारांचा सन्मान घेण्यात आला. तसेच प्रा.डॉ दत्तात्रय साळवे व विद्यापीठ भुगोल या विषयात सुवर्णपद विजेता अजय कुंभार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सहकार महर्षी यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कबड्डी, खो-खो आदी क्रीडा स्पर्धा प्राध्यापक पैलवान नारायण माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तसेच काव्यवाचन, वक्तृत्व, गायन, निबंध लेखन, पुष्प सजावट,रांगोळी, हस्ताक्षर, पारंपारिक दिन या सारखे विविध उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या असून कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा नितीन देशपांडे, प्रा. पुष्पा सस्ते, प्रा. रब्बाना शेख, प्रा. दयानंद साठे, प्रा राजेंद्र साठे, प्रा. उत्तम सावंत, प्रा जगदीशचंद्र मुळीक, प्रा श्रीकांत पवार,प्रा डॉ बाळासाहेब निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र खंदारे यांनी केले तर प्रा. सुहास नलवडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकटीत :
सामान्य माणसाविषयी सहकार महर्षी यांच्या मनात अपार श्रध्दा होती. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी ते तत्पर असत. वंचितांचे, उपेक्षितांचे आणि शेतकऱ्यांचे- शेत मजुरांचे जीवनमान उंचावले जावे यासाठी सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन त्यांनी अकलूज येथे शैक्षणिक संकुल उभा केले.
0 Comments