स. म. कै गणपतराव साठे यांच्या जयंतीनिमित्त पाच दिवसीय माढा महोत्सवाचे आयोजन
माढा (कटूसत्य वृत्त):-
सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकार महर्षी कै गणपतराव साठे यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त पाच दिवसीय माढा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संत कुर्मदास साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१६ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान साजरा होणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात शोभायात्रेने होणार आहे. १६ जानेवारी रोजी स. म. गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेतून ही शोभायात्रा निघणार असून यात विविध वेशभूषा परिधान करून शहरातील शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. १७ जानेवारीला कला व वाणिज्य महाविद्यालय येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी सायंकाळी सात वाजता जि प प्रशाला येथे विविध गुणदर्शन सोहळा होणार असून यात माढा व परिसरातील शाळांचा सहभाग असणार आहे. १८ जानेवारीला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी नऊ वाजता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी नऊ वाजता
खुली राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे.
२० जानेवारीला सकाळी कला व वाणिज्य महाविद्यालयात सकाळी नऊ वाजता छायाचित्र प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. २० जानेवारीला सकाळी अकरा वाजता तुळजाभवानी मंगल कार्यालयात स्पर्धा परीक्षा विषयी व करिअर यावर मान्यवरांचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दापोलीचे प्रांताधिकारी अजित थोरबोले, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस उपनिरीक्षक अनघा गोडगे व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक किशोर लवटे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक सहकार महर्षी गणपतराव साठे प्रतिष्ठान, कै. क्रांती साठे क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ, प्रियदर्शनी महिला विकास मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments