"इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. यात ५५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.'शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा' हे यंदाचे विशेष आकर्षण होते. यात इयत्ता पाचवीच्या एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. शिवजन्म सोहळा, शिवरायांचे बालपण, शिवरायांची स्वराज्य स्थापनेची शपथ, शिवाजी महाराज अफझलखान भेट,आग्याहून सुटका, शाहिस्तेखानाचा पराभव या ऐतिहासिक प्रसंगांचे हुबेहुब सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. तसेच वडील व मूलीच्या नात्या संबंध दृढ करणारा प्रसंग फादर डॉटर थीममधून दाखवण्यात आला. कृष्णलीला नाटिका, वंदेमातरम,फेदर डान्स, आर्मी थिम डान्स, फ्रेंडशिप साँग, अंब्रेला डान्स अशा विविध नृत्यांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी नवदुर्गा गाण्याच्या माध्यमातून देवीच्या विविध रुपांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यामध्ये हावभाव, वेशभूषा, शस्त्र इत्यादींचे हुबेहुब सादरीकरण होऊन नवरसांची निर्मिती केली गेली व कलात्मक पध्दतीने रंगभूषा करण्यात आली होती. याप्रसंगी प्रशालेचे संस्थापक ए. डी.जोशी, सचिव अमोल जोशी, सचिवा सायली जोशी, पोलिस आयुक्त एम.राजकुमार, उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, पोलीस उपायुक्त अजित बोराडे, विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, न्यायाधीश जयश्री काकडे,एसीपी प्रांजल सोनावणे, तहसीलदार श्रीकांत पाटील, शिल्पा ओसवाल, मुख्याध्यापिका मानसी जोशी, अपर्णा कुलकर्णी, अदिती कुलकर्णी, सुजाता बुटटे, अचला राचर्ला, ममता बसवंती, रुही काझी यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments