३१ मुलींच्या नावे माँसाहेब जिजाऊ सुकन्या योजने अंतर्गत प्रत्येकी ५०० रुपये भरून खाते सुरू
बार्शी (कटूसत्य वृत्त):- माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त येथील जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने ३१ मुलींच्या नावे माँसाहेब जिजाऊ सुकन्या योजने अंतर्गत प्रत्येकी ५०० रुपये भरून खाते सुरू करण्यात आले. व त्या खात्यांचे पासबुक वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मुलींच्या शिक्षणासाठी व पुढील भविष्यासाठी हे खाते सुरू करण्यात आले.माँसाहेब जिजाऊ व थोर महापुरुषांच्या विचारांचा वारसा या कार्याच्या माध्यमातून समाजात रुजवण्याचे संघटनेचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भविष्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये मुलींचा सहभाग घेतला जाईल असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते माँ साहेब जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर विविध मान्यवरांचे मनोगत व पासबुक तसेच माहितीपत्रक वितरण करून कार्यक्रम झाला.यावेळी माजी आ. राजेंद्र राऊत,सहायक पोलिस उप निरीक्षक सिंधू देशमुख, अॅड. राजश्री डमरे, शैलजा गीते, संतोष बारंगुळे, रवी राऊत,गोरख यादव, माधवराव देशमुख, सचिन वायकुळे, बाबा कापसे, अमृत राऊत, कुमार डमरे, उमाकांत राऊत, महेश देशमुख, किरण कोकाटे, अजय पाटील, अॅड. गणेश हांडे, धीरज गरजू मुलींचा शोध घेऊन मदत गेल्या पंधरा दिवसांमध्ये अनेक गरजू मुलींची परिस्थिती जाणून त्यातील ३१ गरजू मुलींचा या योजनेत सहभाग घेऊन त्यांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता संघटनेच्या माध्यमातून पोस्टऑफिसमध्ये करून प्रत्येक खात्यात ५०० रुपये जमा करण्यात आले.शेळके, बालाजी, कानगुडे, पोस्ट अधिकारी राहुल जाधव, रविंद्र बगाडे, अजित नडगिरे याच्यासह शिवभक्त व जय शिवराय प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जय शिवराय प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments