भैरवनाथ'चा २८०० पहिला हप्ता खात्यात जमा-चेअरमन सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 13, 2025

भैरवनाथ'चा २८०० पहिला हप्ता खात्यात जमा-चेअरमन सावंत

 भैरवनाथ'चा २८०० पहिला हप्ता खात्यात जमा-चेअरमन सावंत



नंदेश्वर (कटूसत्य वृत्त):- भैरवनाथ शुगर वर्क्स लि., युनिट नं.३, लवंगी, या कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ मधील १५ डिसेंबर पर्यंतचे उसाचे बिल प्रति मे. टन २८०० रूपयाप्रमाणे शेतकरी उस उत्पादकांच्या खात्यात जमा केल्याची माहिती भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली.भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे संस्थापक माजी आरोग्यमंत्री आ. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली व चेअरमन प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४- २५ च्या चालू हंगामातील गाळप सुरू झाले असून शेतकऱ्यांना पहिली उचल २८०० प्रती मे.टन दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचा सर्व ऊस गाळपासाठी प्रोग्रामप्रमाणे नेला जाणार असून चांगल्या प्रतिचा ऊस पुरवठा कारखाण्यास करावा, असे आवाहनही प्रा.सावंत यांनी केले. तसेच एफआरपी पेक्षा जास्त दर आतापर्यंत दिलेला आहे. शेतकऱ्यांनी आजपर्यंत दाखवलेल्या विश्वासावरच भैरवनाथ शुगरचे विक्रमी गाळप होईल, असे त्यांनी सांगितले. व्हा. चेअरमन अनिल सावंत म्हणाले, भैरवनाथ शुगरने सुरुवातीपासुन ऊस उत्पादकांशी असलेली बांधीलकी कायम ठेवत त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. ऊस उत्पादकांनी आपला जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा.यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages