होटगीच्या लघुपाटबंधारे विभागाच्या पाझर तलावातून शेतकऱ्यांसाठी पहिले आवर्तन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- होटगीच्या लघुपाटबंधारे विभागाच्या पाझर तलावातून शेतकऱ्यांसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. होटगी तलावात सध्या ८४ टक्के इतका पाणीसाठा असून, शेती पिकांसाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. असून साधारणतः २० ते २५ दिवस चालू ठेवण्यात येणार आहे.रावळसिद्ध पाणी वापर संस्थेच्या मागणीवरून होडगे तलावातून हे आवर्तन सोडण्यात आले आहे.शेतकऱ्यांची आणखीन मागणी असेल तर आणखीन पाच दिवस वाढीव देण्यात येईल होटगी : पाझर तलावातून शेतीसाठी सोडण्यात आलेले पहिले आवर्तन.उन्हाळ्यातील पिकांसाठी दुसरे आवर्तन उपलब्ध पाणीसाठा पाहून निर्णय घेण्यात येईल.असे लघुपाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता वाकचौरे यांनी सांगितले.या पाण्याचा रब्बी पिकांसाठी फायदा होणार असून याचबरोबर नवीन पिकांच्या लागवडीसाठी देखील लाभ होणार आहे.तलावातून कॅनलद्वारे पहिले आवर्तन सोडण्यात आल्यामुळे याचा लाभ होटगीसह मद्रे गावातील शेतकऱ्यांना होणार आहे.
0 Comments