Hot Posts

6/recent/ticker-posts

साेलापूर जिल्ह्यात सुरू होणार आणखी चार लॉ कॉलेज

 साेलापूर जिल्ह्यात सुरू होणार आणखी चार लॉ कॉलेज



                

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित चार लॉ महाविद्यालयांना राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून मंजुरी मिळाली असून विद्यापीठाचीही त्यांना मान्यता मिळाली आहे. आता बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे मान्यतेसाठी या महाविद्यालयांचे प्रस्ताव गेले आहेत. त्यांच्याकडून काही दिवसांत मान्यता अपेक्षित असून आगामी शैक्षणिक वर्षापासून या नव्या चार महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात डी.जी.बी. दयानंद लॉ कॉलेज (सोलापूर), राजर्षी शाहू लॉ कॉलेज (बार्शी), कै. कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील लॉ कॉलेज (पंढरपूर) या दोन उच्च महाविद्यालयांमध्येच लॉ शिक्षणाची सोय आहे. वकिली शिक्षणाकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे, पण महाविद्यालयांची संख्या व प्रवेश मर्यादित असल्याने अनेकांना परजिल्ह्यात शिक्षणासाठी जावे लागत आहे. दुसरीकडे अनेकांना प्रवेश मिळेपर्यंत वाट पहावी लागत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments