नातेपुते येथील महाविद्यालयात जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.जगदिश मुळीक,प्रा. उत्तम सावंत, प्रा.डॉ. दत्तात्रय शहाणे तसेच एस.एस. सालगुडे, नागराज करपे, नितीन जगताप यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.जगदिश मुळीक बोलत असताना म्हणाली की, राजमाता जिजाऊं यांच्यामध्ये
स्वराज्याविषयी तळमळ होती. योद्धा वृत्ती, व्यापक विचारसरणी, युद्धनिती, त्यागकरण्याची वृत्ती आणि इच्छा असे बहुआयामी गुण होते. राजमाता जिजाऊंच्या संस्कारामुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले. जिजाऊंनी संपूर्ण समाजाला स्वाभिमानाची जाणीव करुण दिली. स्वामी विवेकानंद यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात काम केले त्यांनी भारतातील लोकांशी संवाद साधला आणि त्यांना जातीय व्यवस्था दूर करण्यासाठी आणि विज्ञान आणि औद्योगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आव्हान केले स्वामी विवेकानंद यांचे मौल्यवान विचार प्रत्येक तरुणाच्या जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करत असल्याचे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.जगदिश मुळीक यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्यक्त केले.कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी तसेच प्राध्यापक प्राध्यापिका व महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments