मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे
आ. अभिजित पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघाच्या शिवधर्म या राष्ट्रीय दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते माढ्यात करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक दिनेश जगदाळे, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, तालुका उपाध्यक्ष शिवानंद बारबोले, शिक्षक सहकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी कदम, डॉ.बालाजी शिंदे,नितीन कापसे,शंभूराजे साठे, बालाजी परबत यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे आमदार अभिजित पाटील यांनी कौतुक करीत महाराष्ट्रात पुरोगामी विचारधारा घरोघरी पोहचविण्यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरूषोत्तम खेडेकर साहेबांच्या विचारांतून तयार झालेल्या शिवधर्म दिनदर्शिकेचा फार मोठा फायदा झाल्याचे सांगितले. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
0 Comments