नेताजींच्या विद्यार्थ्यांकडून बहारदार कलाविष्कार सादर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या २२५ विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध कलाविष्कार सादर केले.
हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कटक या जन्मगावचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक व रोटेरियन उपेंद्रकुमार महाराणा , केंद्रप्रमुख स्वप्नील चाबुकस्वार, शहर मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्षा लक्ष्मी चिलवेरी,सचिव बुडप्पा चिकनी, मनपा अधिकारी सिद्धाराम कुंभार, संस्थेचे लेखापरीक्षक महेश आळंगे, अभियंता प्रकाश तोरवी, सेवानिवृत्त प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी,विजयकुमार हुल्ले, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार,विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांनी अहवाल वाचनातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख अतिथी उपेंद्रनाथ महाराणा म्हणाले , सोलापूरात देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने शाळा असल्याने अभिमान वाटले.या शाळेतील विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जाज्वल देशभक्ती, देशसेवा व देशनिष्ठा जागृत ठेवण्याचे आवाहन केले. संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलनाची आवश्यकता आहे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो.कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळत असते. विद्यार्थ्यांनी आईवडिलांचे नाव लौकीक करावे असे आवाहन केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणपती गीत, तांडव नृत्य, भरतनाट्यम, नाटक- सोशल मीडियाचे दुष्परिणाम, तेलुगू गीत, देशभक्तीपर गीत, पंजाबी गीत, तमिळ नृत्य, गरबा नृत्य,गोंधळ गीत,लावणी आदी विविध गाण्यावर नृत्य सादर करुन पालकांचे वाहवा मिळविले. सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन जयश्री बिराजदार व शिवानंद पुजारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
0 Comments