नातेपुते पोलीसांनी चोरी झालेले २० मोबाईल , ६ लाख १६ हजार किमंतीचे सोन्याचे दागिणे फिर्यादीस परत
नातेपुते(कटूसत्य वृत्त):-
सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस सोलापूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे हददीत दिनांक ०९/०८/२०२३ रोजी रात्राो ०२:०० वा ते ०३:४५ वा चे दरम्यान फिर्यादीनामे श्री सुभाष नरहरी केंजळे वय ५४ वर्षे व्यवसाय शेती रा केंजळेवस्ती धर्मपुरी ता माळशिरस यांचे राहते घर फोडुन घरफोडी झालेबाबत फिर्याद प्राप्त झाली होती. त्यांची तक्रारीवरुन नातेपुते पोलीस ठाणे येथे २५३/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री महारुद्र परजने नातेपुते पोलीस ठाणे हे करीत होते. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहिती मिळवुन सदर गुन्हा करणारे वेगवेगळे आरोपीना नातेपुते पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी श्री विक्रांत डिगे पोलीस उपनिरीक्षक व पोहकॉ राहुल रणनवरे पोहेका नवनाथ माने, पोना अमोल वाघमोडे पोना राकेश लोहार पोकॉ नवनाथ चव्हाण यांनी आरोपीनामे देवगण बापु उर्फ विजय पवार रा आटपाडी सांगली यास अटक करुन त्यांचेकडुन वरिल गुन्हयातील २,००,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिणे हस्तगत केले होते सदरचे सोने फिर्यादीस देणेबाबत श्री. यु बी पेठे मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस न्यायालय यांचे आदेश झाल्याने तसेच नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील गहाळ व चोरी झालेले वेगवेगळया कंपणीचे मोबाईल पोकॉ रणजित मदने नातेपुते पोलीस ठाणे, पोकॉ रतन जाधव सायबर पोलीस ठाणे यांनी तांत्रिक विश्लेशन करुन सुमारे ४,१६,०००/-रु किंमतीचे वेगवेगळया कंपणीचे २० मोबाईल हस्तगत केले असुन वरिल एकुण ६,१६,०००/- रु किंमतीची मुददेमाला "महाराष्ट्र पोलीस रेजींग डे सप्ताह" चे औचित्य साधुन वरिल मुददेमाल मा. श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सो। सोलापुर ग्रा., मा. श्री प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा. मा.श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोो अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे भव्य प्रांगणात समारंभपुर्वक वरिल सर्व गुन्हयातील फिता यांना बोलावुन घेवुन त्यांना सोन्याचे दागिणे व मोबाईल परत करण्यात आले त्यावेळी नातेपुते पोलीस ठाणेचे श्री महारुद्र परजने सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे, पोहेकॉ रामचंद्र चौधरी, पोहेकॉ राहुल रणनवरे, पोहेकॉ महादेव कदम, पोना राकेश लोहार, पोकॉ रणजित मदने, पोकॉ दिनेश रणनवरे, पोकॉ नितीन पन्नासे, पोकॉ अमोल बंदुके, पोकॉ सोमनाथ मोहिते, पोकॉ रमेश बोराटे, पोकॉ गणेश कुलकर्णी, पोकॉ रमेश कर्चे, पोकॉ अमोल देशमुख, पोकॉ नवनाथ थिटे, मपोकॉ नेहा बोंदर यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हददीतील नागरीकांकडुन नातेपुते पोलीस ठाणेच कौतुक करण्यात येत असुन नागरिकांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट :
२०२३ ला माझ्या घरात चोरी झाली होती त्या चोरी संदर्भात नातेपुते पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंद करण्यात आली होती झालेला चोरीचा तपास लावून माझे चोरीस गेलेले सोन्याचे गंठण सोन्याची डोरले व चांदीचे पैंजण आज रेझिंग डे निमित्त नातेपुते पोलीस ठाणे येथे मला परत मिळाले त्याबद्दल मला खूप आनंद झाला नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे पीएसआय विक्रांत डिगे व पोलीस प्रशासन यांचे मी आभारी आहे.
सुभाष केंदळे ( फिर्यादी )
धर्मपुरी तालुका माळशिरस
0 Comments