तोडणी वाहतूक बिलाची 30 कोटी रक्कम वाहनमालकांच्या खात्यावर जमा
पिंपळनेर (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्याचे 15 डिसेंबर अखेर ऊस तोडणी वाहतूक बील वाहनमालक यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष मा.आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना मा.आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2024-25 चा गाळप हंगाम जोमाने सुरू असून युनिट नं.1 येथे प्रतिदिन 13500 ते 14000 मे.टन व युनिट नं.2 येथे प्रतिदिन 4500 ते 5000 मे.टन गाळप होत आहे. युनिट नं.1 येथे आजअखेर 5 लाख 26 हजार 942 मे.टन ऊस गाळप झाले आहे. तसेच युनिट नं.2 येथे आजअखेर 1 लाख 85 हजार 081 मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर 7 लाख 12 हजार 023 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे.
या गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कडे ऊस तोडणी वाहतूकीसाठी असलेल्या वाहनमालकांची दि.15 डिसेंबर अखेरपर्यंतची तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली आहेत. तोडणी वाहतूक बिलापोटी कारखान्याने 30 कोटी 89 लाख अदा केले आहेत. ऊस तोडणी वाहतूक बिलाची रक्कम वाहनमालकांच्या खात्यावर जमा करणेत आली आहे.
0 Comments