Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात बालिका दिन साजरा

लोकमंगल कृषी महाविद्यालयात बालिका दिन साजरा



 वडाळा  (कटूसत्य वृत्त):-  श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. सदरील कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून कृषी अभियांत्रिकी विभागाच्या विभाग प्रमुख प्रा सुजाता चौगुले ह्या लाभल्या होत्या. सर्वप्रथम अध्यक्ष, उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी कु संजना पाटील हिने आपल्या प्रास्ताविकाद्वारे बालिका दिनाची संकल्पना आणि जयंती उत्सवाचे महत्त्व सर्वांना समजून सांगितले. यानंतर विद्यार्थी मनोगता मध्ये कु. साक्षी काळे, कु. वैष्णवी घोळवे, कु. सायली घाडगे,कु. रेवती लावंड,कु. प्राची अवताडे, कु. अंबिका फटाटे, कु. योगिता शिंदे,  कु. संजीवनी हालोली आणि आदेश काळे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा दैदीप्यमान इतिहास सर्वांसमोर उभा केला.  सावित्रीबाई फुले या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका,  मुख्याध्यापिका, समाज सुधारक, महिला सशक्तिकारक, कवयित्री, लेखिका इत्यादी अनेक विविध अशा सावित्रीबाईंच्या गुणगौरवावर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता मधून प्रकाश टाकला. यानंतर  प्रा. स्वाती खोबरे, प्रा. ज्ञानसागर सुतार आणि प्रा. अजित कुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाईंच्या जीवन चरित्रा मधून सद्यस्थितीला अपेक्षित असणारे आणि समाजमूल्य जपणारी विविध गुणवैशिष्ट्ये अंगीकृत करण्याचे यावेळी सर्वांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगता मधून प्रा. सुजाता चौगुले यांनी भारतीय संस्कृतीला अभिप्रेत असणारी आजच्या काळातील सावित्रीबाई कशी असावी आणि त्याकरता विद्यार्थी दशेत अपेक्षित असणाऱ्या बाबी याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. संजना पाटील हिने केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील कार्यक्रमास प्रा. कल्पना मिटकरी, प्रा. सुकन्या जाधव, प्रा. शुभांगी काळे, प्रा. प्रज्ञा कुदळे आणि प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. 
Reactions

Post a Comment

0 Comments