Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रमिक पत्रकार संघ, डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने , पत्रकारांसह कुटुंबीयांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न.

 श्रमिक पत्रकार संघ, डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय 

महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ,

पत्रकारांसह कुटुंबीयांसाठी मोफत 

नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न. 

#  91 रुग्णांची तपासणी  # १३  रुग्णावर होणार शस्त्रक्रिया.

पत्रकारांनी डोळ्याची काळजी घेणे गरजेचे - कृष्णकांत चव्हाण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पत्रकार हा समाजाचा आरसा असून हा आरसा कायम स्पष्ट आणि चकचकीत असणे गरजेचे आहे त्याचबरोबर पत्रकाराकडे दूरदृष्टी कायम असते ती दूरदृष्टी मजबूत राहावी म्हणून पत्रकारांनी डोळ्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण यांनी व्यक्त केले.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ,  छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार  रुग्णालय, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसह त्यांचे कुटुंबीय आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्रचिकेचा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चव्हाण हे बोलत होते.

श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात हे शिबिर पार पडले. 

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर ,सहयोगी प्राध्यापक डॉ. सुहास सरवदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापिका. डॉ. स्नेहलता येळमकर, डॉ. दौला ठेंगील, डॉ. श्रीकांत जाधव, डॉ. अर्चना यादव, डॉ. आकांक्षा पालीवाल, डॉ. प्रतीक्षा तानगावडे, डॉ. वैभवी कांबळे, डॉ. साक्षी बोगा ,  डॉ. अश्विनी आवटे, डॉ. विश्वजीत मठपती आदींनी तपासणी करून ९१ रुग्णावरती औषधोपचार केले. तर १३ रुग्णावरती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे,  आदींसह पत्रकार संघाचे सदस्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

     यावेळी प्रा. डॉ. स्नेहलता येळमकर यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि उपचार यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, प्रत्येकाने नियमित नेत्र तपासणी करून घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढे उपचार घ्यावेत, असे आवाहन केले. 

         यावेळी पत्रकार, पत्रकारेत्तर कर्मचारी आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments