सरकार मस्त जनता त्रस्त
जर सरकारच धर्म आणि हिंदू-मुस्लीम नावावर
स्थापन होत असेल तर मग सर्वसामान्यांची चिंता कोण कशाला करेल....
अंबाला कॅन्टमधील जनरल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर अनेकदा अपघात होतात. एका प्रवेशद्वाराच्या अगदी समोर तीन रस्ता आहे तर दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर चार रस्ता आहे. तेथे सिग्नल दिवे नाहीत आणि स्पीड ब्रेकरही नाही. तिथे वाहतूक पोलीसदेखील कधीच उभे नसतात. रुग्णालयाच्या एका प्रवेशद्वाराजवळ पोलिसांची केबिन आहे, मात्र तिथे एकही पोलीस नजरेस पडत नाही. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री १०:५० च्या सुमारास आम्ही रुग्णालयाच्या प्रवेशद्वारामधून बाहेर पडलो, कारण रुग्णाला भेटण्याची वेळ ११ वाजताची होती. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी आम्ही मोठ्या कष्टाने रस्ता ओलांडून चहा पिण्यासाठी बाहेर गेलो, कारण एवढ्या मोठ्या रुग्णालयात जिथे हजारो रुग्ण असतात तिथे एकही कॅन्टीन किंवा चहाचा छोटा स्टॉलदेखील नव्हता. प्रत्येक रुग्णासोबत किमान २ माणसं येतच असतील; त्यांना बाहेर जाऊन रस्ता ओलांडावा लागतो, जे अत्यंत धोकादायक आहे. आम्ही बसून चहा पीत होतो, तेवढ्यात मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला आणि सोबतच समोर आगीचा लोट दिसला. आमच्या समोर एका बुलेटला एका कारने एवढ्या जोरात धडक दिली की, बुलेटचे मधूनच दोन तुकडे झाले आणि कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला.
अपघातांचे शहर
बुलेटमधील दोन्ही मुलांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना गंभीर घोषित करण्यात आले आणि चंदिगड पीजीआयना सूचित करण्यात आले. काही दिवसांपूर्वीही याच रस्त्यावर एका मोटारसायकलस्वाराला एक ट्रक खूप दूरपर्यंत खेचत घेऊन गेला होता आणि यात त्याचा मृत्यू झाला. उद्योगपती नवीन जिंदाल यांनी या रुग्णालयाचे नूतनीकरण केले आणि रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत म्हणून दिल्लीहून येथे हृदयरोग तज्ज्ञही उपल्ब्ध करुन दिले. पण, रुग्णांसाठी केवळ शस्त्रक्रियाच पुरेशी आहे का ? कधी रुग्णाला चहा प्यावासा वाटतो, कधी त्याच्यासोबत राहणारी व्यक्ती किंवा त्याला भेटायला येणाऱ्याला चहाची तलप येते. या सर्वांसाठी मोठी नको, निदान एक छोटी कॅन्टीन तरी असली पाहिजे. दरवेळी महामार्ग ओलांडून पलीकडे जाणे किती धोकादायक आहे, हे येथे. दररोज होणाऱ्या अपघातांवरून लक्षात येते. जिंदाल साहेब अनेकदा येथे फेरी मारतात, मग त्यांना हे सर्व दिसत नाही का ? त्यांना या अपघातांची माहिती नाही का ? चार रस्ते असलेल्या ठिकाणी ट्रैफिक लाइट आणि वाहतूक पोलीस असणे गरजेचे आहे, हे त्यांना माहीत नाही का ? हा अपघात रात्री घडला तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजल्यानंतर तेथे दोन पोलीस तैनात असलेले दिसले, जे केवळ चालान काढत होते किंवा कोणाला तरी थांबवून खिसे भरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, २ दिवसांनंतर पोलीस पुन्हा तेथून गायब दिसले.
पोलिसांचे कारनामे
पोलिसांनी थांबवले आणि चालान देण्याऐवजी ५०० रुपये घेऊन सोडून दिले, अशा प्रकारचे पोलिसांचे कारनामे दररोज ऐकायला मिळतात. याचा अर्थ काय ? दोषी व्यक्ती पुन्हा चूक करणार नाही का ? तो तसे नक्कीच करेल, कारण त्याला माहीत आहे की २००-४०० रुपये देऊन प्रकरण झाकले जाईल. हेच कारण आहे ज्यामुळे देशातील निम्मी लोकसंख्या हेल्मेट घालत नाही, स्कूटर आणि मोटारसायकल चालवणाऱ्यांकडे पूर्ण कागदपत्रं नसतात. त्यामुळेच आपल्या काही भ्रष्ट पोलिसांचे खिसे भरलेले राहातात. ही परिस्थिती केवळ अंबाला परिसराची नाही, तर अंबाला नागरी रुग्ण यमुनानगरच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक चौकाची हीच परिस्थिती आहे आणि इतरही अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला मिळते. उर्वरित देशाचीही तीच स्थिती आहे. अर्ध्याहून अधिक लोक याला वरच्याची कृपा मानतात तर काहीजण गर्दीत आरडाओरड करुन आपला राग व्यक्त करतात, पण लोकांची होणारी गैरसोय यावर क्वचितच कोणी संबंधित अधिकाऱ्याला पत्र लिहिते.
वसूल करता येत असेल तर वसूल करा
जिथे टोल कर आकारणीचे बॅनर लावले जातात तिथे संपूर्ण कर्मचारी तिथेच राहातात, जेणेकरून टोल पूर्णपणे वसूल होईल. जनतेकडून संपूर्ण कर वसूल करणे, हा सरकारचा अधिकार असेल तर त्या जनतेचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य नाही का ? आपण अनेकदा ऐकतो की, रस्ता दुर्घटनेत कुणाचा तरी मृत्यू झाला, कुणाला तरी ट्रकने, कुणाला तरी बसने चिरडले तर कधी फूटपाथवर कुणावर तरी कार चढवली गेली. जेव्हा एखादा गरीब किंवा सामान्य माणूस मरतो तेव्हा ती बातमी कोणाच्याच कानी पडत नाही. पण एखाद्या श्रीमंताच्या पुत्राला अपघातात दुखापत झाली तर त्याला भरपाई द्यावी लागते. गुन्हादेखील दाखल केला जाऊ या उपकांना कोण जबाबदार ही आहे का ? या अपघातांसाठी दुचाकी चालक, कार, बस चालक किंवा दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीलाही सरकार किंवा इतर लोक जबाबदार धरतात, पण प्रत्येक अपघातामागे हेच सत्य असते, असे नाही.
रस्ते सुरक्षित नाहीत
असे मानले जाते की, सरकारने अनेक पूल बांधले आहेत, बहुतेक शहरांच्या बाहेर महामार्ग बांधून शहरातील गर्दी कमी केली आहे आणि रस्ते देखील मोठ्या प्रमाणात रुंद आणि नवीन केले आहेत. रस्ते बांधले गेले. पण ते व्यवस्थित म्हणजे सुस्थितीत आहेत का ? म्हणजे प्रत्येक रस्त्यावर पथदिवे आहेत का ? अपघातासाठी रस्त्यालगतची दुकाने जबाबदार आहेत का ? चार रस्ते मिळतात त्या प्रत्येक चौकाच्या आधी स्पीड ब्रेकर किंवा रिफ्लेक्टर आहे का? तिथे लाल, पिवळे आणि हिरवे वाहतूक सिग्नल दिवे आहेत का ? प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस तैनात आहेत का ? 'नाही. मग ते महामार्ग आणि रस्ते मोठे करून काय उपयोग ? कारण रस्ते जितके गुळगुळीत आणि रुंद असतील तितक्या वेगाने वाहने जातील.
दुर्घटनांसाठी जबाबदार कोण?
स्पीडब्रेकर जरी नसले तरी रिफ्लेक्टर असावेत, त्यामुळे येणाऱ्या वाहनाला दुरूनच तेथे काही अडथळा निर्माण होण्याची शंका येऊन तो वेगावर नियंत्रण ठेवू शकतो. परंतु, बहुतांश ठिकाणी स्पीड ब्रेकर, ट्रैफिक सिग्नल दिवे, वाहतूक पोलीस, यापैकी कोणीही नसते आणि हेच अपघाताचे कारण ठरत असल्याचे दिसून येते. नुसते रस्ते रुंद करून काहीही साध्य होणार नाही, त्या रस्त्यांवर सिग्नल दिवे आणि स्पीड ब्रेकरही हवेत. या सर्व अपघातांना जबाबदार कोण? या अपघातांना रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा अभाव जबाबदार आहे का ? प्रत्येक चौकाचौकात सिग्नल लाइट असायला नकोत का ? आपल्या देशाची व्यवस्था इतकी संथ का आहे ? कारण, सत्ताधारी हा धर्माच्या, उपासनेच्या, हिंदू-मुस्लीमच्या नावाने ठरवला जातो, त्याच्या कार्यशैलीमुळे नाही. निवडणुका आल्या की, मंदिरांची सजावट सुरू होते, रस्ते दुरुस्त करायला वेळच नसतो, कारण त्यांच्याकडून मत आणि सत्ता मिळणार नसते, त्यामुळे मग त्यांची चिंता कोण आणि कशाला करेल ? जनतेला त्यांची जबाबदारी कधी तरी समजेल का कधी तरी?
प्रेम बजाज
0 Comments