नातेपुते येथील एस एन डी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालयास भेट
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील एस एन डी इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलच्या इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व क्षय रोगाविषयी माहिती करून घेण्यासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी डॉ. शिवाजी शेंडगे, डॉ. गोरख सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना क्षय रोगाविषयी माहिती सांगून ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे विषयी तसेच ऑपरेशन थेटर यामध्ये ऑपरेशन कशा प्रकारे केले जाते व रुग्णालयात ब्लड तपासणी कशा प्रकारे केली जाते याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगून ग्रामीण रुग्णालयात जिल्हा चिकित्सक डॉ. सुहास माने व वैद्यकीय अध्यक्ष डॉ.महेश गुडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती सांगितली. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच डॉक्टर नर्स उपस्थित होते. उपस्थित डॉक्टर यांच्याकडून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आजाराविषयी तसेच औषध उपचार याविषयी माहिती जाणून घेतली. प्राचार्य संदीप पानसरे स्कूल मॅनेजर शकूर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक हरिदास गोरवे, भैय्यासाहेब भागवत, आदित्य दाभोळे, ज्योती मोरे यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयातील माहिती मिळावी म्हणून परिश्रम घेतले.
0 Comments