Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

नेताजी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात


 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन हुतात्मा स्मृती मंदिर येथे उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते.प्रमुख अतिथी उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, शेळगी केंद्राचे केंद्रप्रमुख विकास पाटील यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कृष्णा खमितकर, माता पालक संघाच्या सदस्या कल्पना जिबरे, संस्थेच्या संचालिका ललिता कुंभार,शालेय समितीचे सदस्य सिद्धाराम कुंभार, नेताजी प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, राजराजेश्वरी प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी म्हणाले , नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेत विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नेताजी शाळा नेहमी तत्पर असतो.पालकांच्या दृष्टीने ही गौरवाची बाब आहे. अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले , विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हे शिक्षक व पालकांचे कर्तव्य आहे. प्रत्येक उपक्रमातून मुले नवनवीन गोष्टी शिकत असतात. संस्कारक्षम व गुणवंत विद्यार्थी हेच शाळेचे व आईवडिलांचे भविष्य उज्ज्वल करतात म्हणून पालकांनी पाल्यांना संपत्तीपेक्षा जास्त लक्ष द्यावे असे आवाहन केले. स्नेहसंमेलनात इयत्ता बालवाडी ते चौथी पर्यंतच्या ४९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पी.पी.टी.द्वारे शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गणपती गीत, शेतकरी गीत, कोळी गीत, गोंधळ गीत ,महाराष्ट्र  गीत, फेस्टिवल सॉंग, पोवाडा, डोंबारी गीत, लावणी, मोबाईलचे दुष्परिणाम सांगणारे नाटिका, पंजाबी सॉंग,दिंडी अशा विविध प्रकारच्या गाण्यावर कलाविष्कार सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदेवी रोडगे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन शिवांगी आडकी व शोभा लिंबोळे यांनी केले तर राजशेखर पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.


Reactions

Post a Comment

0 Comments