जिल्हा परिषद कोर्टी शाळेत बाल आनंदी बाजार उत्साहात संपन्न
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोर्टी येथे बाल आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. सदर बाल आनंदी बाजाराचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शबाना अमीर शेख व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शशिकला परचंडे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच राजाभाऊ पवार व उपसरपंच मुन्ना शेख, माजी सरपंच रघुभाऊ पवार ,माजी उपसरपंच महेश येडगे, आगतराव बाबर ,ग्रामपंचायत सदस्य सौ. सुमन होनकडे , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य फरहान मुलाणी, श्रीनाथ बाबर, दिनेश चव्हाण, मधु सकटे ,बिरा शिंदे, समाधान शेंडगे, दत्ता ओव्हाळ,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुरज लवटे ,पत्रकार राजू बाबर, अमोल गुरव , गावातील सर्व मान्यवर , सर विद्यार्थ्यांचे पालक माता पालक ग्रामस्थ तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करून आनंदी बाजाराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध पालेभाज्या, विविध फळे ,खाऊ पदार्थ ,स्टेशनरी ,कपडे दुकान, शालेय उपयोगी साहित्य यामधून जवळपास पंधरा हजार रुपयाची आर्थिक उलाढाल झाली. विद्यार्थ्यांच्या बाल आनंदी बाजाराचे मान्यवर ,पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments