Hot Posts

6/recent/ticker-posts

अधिकाऱ्यांची ७० टक्के पदे रिक्त असल्याने शाळांना भेटीच नाहीत

 अधिकाऱ्यांची ७० टक्के पदे रिक्त असल्याने शाळांना भेटीच नाहीत




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शाळांची गुणवत्ता वाढावी, शाळांमधील अध्यापन, माध्यान्ह भोजन अशा विविध बाबींवर लक्ष राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची त्रिस्तरीय यंत्रणा आहे. त्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांवर आहे.

मात्र, सोलापूर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी या अधिकाऱ्यांची २७४ पदे मंजूर आहेत, पण सध्या १०४ अधिकारीच आहेत. त्यामुळे अनेक शाळांना भेटीच दिल्या जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाकडील केंद्रप्रमुखाकडे १० ते १२ शाळा, दोन ते पाच केंद्राची जबाबदारी विस्ताराधिकाऱ्यांकडे तर गटशिक्षणाधिकाऱ्याकडे प्रत्येक तालुक्यातील शाळांची जबाबदारी दिलेली असते. मात्र, सध्या या अधिकाऱ्यांची ६५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत जाऊन तेथील गुणवत्तेसह अन्य बाबींचा आढावा घेण्यास अडचणी येत आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढलेला असतानाच जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करीत अनेक शाळांची पटसंख्या कमी होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments