Hot Posts

6/recent/ticker-posts

परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठाची केवळ तीन भरारी पथके

 परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठाची केवळ तीन भरारी पथके




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सध्या सत्र परीक्षा सुरू आहे. विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील सुमारे ७२ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

पण, संपूर्ण जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठाने केवळ तीन भरारी पथके नेमली असून त्यांच्यावर तब्बल १०५ केंद्रांची जबाबदारी असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे परीक्षा खरोखर कॉपीमुक्त होतेय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणातून पुढे चांगली नोकरी, रोजगार मिळावा म्हणून विविध राज्यातील, जिल्ह्यातील विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरातील उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. पण, २१ वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात परराज्यातील अगदी बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामागे अध्यापन, परीक्षा, गुणवत्ता हीच कारणे आहेत. महाविद्यालयात नियमित तास होत नाहीत, परीक्षेत म्हणावी तेवढी पारदर्शकता दिसत नाही, निकालात गोंधळ, परीक्षेच्या वेळापत्रकात सतत बदल, निकाल विलंब अशी कारणे आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments