Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारचं पुन्हा घुमजाव 'लाडक्या बहिणीं'सोबत चाललाय खेळ!

 सरकारचं पुन्हा घुमजाव 'लाडक्या बहिणीं'सोबत चाललाय खेळ! 




मुंबई (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुका तोंडावर असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. पण आता निवडणुका पार पडल्यानंतर या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अपात्र महिलांबाबत सरकारनं वारंवार परस्पर विरोधी भूमिका मांडल्या असल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पुन्हा सरकारनं अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळं सरकारनं नेमका कसला खेळ चालवलाय असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, कुठलीही योजना असली तरी त्याची सालाबादप्रमाणं पडताळणी केली जाते. तुम्ही संजय गांधी निराधार योजना जरी घेतली तरी त्याचं वर्षातून एकदा पडताळणी केली जाते. तसंच सिलेंडरच्या सबसिडीबाबत किंवा नमो शेतकरी योजना असेल यात कोण पात्र, कोण अपात्र याची पडताळणी होत असते. ही रुटीन पद्धत असून ती जगावेगळी किंवा नवीन आणलेली प्रकिया नाही. पण लाडकी बहीण योजना नवीन असल्यामुळं आणि याचं पहिलंच वर्ष असल्यामुळं याबाबत संभ्रम निर्माण करण्यात येत आहे.

लाडक्या बहीण योजनेला अजून एक वर्षही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळं याबाबत वेगवेगळे समज निर्माण होत आहेत. आम्ही आत्तापर्यंत एकाही महिलेचा त्यांच्या इच्छेविना किंवा ज्यांनी आपल्याला सरकारी नोकरी लागल्यानं स्वतःहून विनंती केलेली आहे की, मी या योजनेसाठी पात्र होत नाही. त्यांच्याबाबत वेगळा निर्णय झालेला आहे. पण या व्यतिरिक्त इतर कुठल्याही महिलेचा लाभ आम्ही परत घेतलेला नाही. पण पडताळणीत ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचा पाच महिन्यांचा लाभ परत घेण्याचा प्रश्नच येत नाही. कारण याबाबत शासनानं कुठलीही चर्चाही केलेली नाही किंवा निर्णयही झालेला नाही.

दरम्यान, लाभ परत करण्यासाठीचे अर्ज दररोज चार-पाच येत आहेत, हा आकडा दररोज बदलत असतो. कारण पडताळणीनंतर आता काहींना हे माहिती झालं आहे की, आपण यासाठी अपात्र ठरलो आहोत त्यामुळं ते अर्ज परत करत आहेत. पण आम्ही स्वतःहून त्यांच्याकडून अपात्रतेचे अर्ज मागवलेले नाहीत. आम्ही शासन म्हणून कुठल्याही लाभार्थ्याच्या लाभाला हातही लावलेला नाही. सध्या आमच्याकडं चार-चाडेचार अपात्रतेचे अर्ज आलेले आहेत. पण त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments