माझ्या वडिलांना लवकर न्याय का मिळत नाही?" वैभवी देशमुख चा पोलीस प्रशासनाला सवाल
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- माझ्या वडिलांची हत्या होऊन कित्येक दिवस उलटून गेले परंतु अजूनही माझ्या वडिलांना न्याय मिळालेला नाही पोलीस प्रशासन न्याय का मिळवून देत नाही.? असा सवाल आज पंढरपूर येथील जन आक्रोश मोर्चा पंढरपूर येथे काढण्यात आला होता त्यावेळी आपल्या भाषणांमधून बोलत असताना कुमारी वैभवी देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या हत्यानंतर आपल्या कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था व पोलीस धिम्या गतीने करीत असलेला तपास पोलीस प्रशासन माझ्या वडिलांना न्याय का देऊ शकत नाही. माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या सर्व गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी.
माझ्या कुटुंबाच्या सोबत संपूर्ण समाज तसेच सर्व सामाजिक संघटना व विविध जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आहे आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यानी शेवटपर्यंत साथ द्यावी अशी अपेक्षा वैभवी देशमुख यांनी व्यक्त केली. या जन आक्रोश मोर्चाला हजारोच्या संख्येने लोक जमा झाले होते.
0 Comments