विभागीय आयुक्त गावडे,जिल्हाधिकारी स्वामी, उपविभागीय अधिकारी पठाण यांना पुरस्कार जाहिर
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पुरस्कार जाहिर केले असून त्यात विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिकांचे देवाण घेवाण चे उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार देण्यात आला असून सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी (१०४- सिल्लोड विधानसभा) म्हणून पुरस्कार जाहिर झाला आहे.
यासंदर्भात आज मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा, उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा, टपाली मतपत्रिका देवाण घेवाणचे उत्कृष्ट नियोजन, मतदान साहित्य प्राप्त करण्याचे नियोजन, उत्कृष्ट मतदार सुविधा , उत्कृष्ट वार्तांकन आणि उत्कृष्ट शासकीय भागीदारी अशा गटात पुरस्कार जाहीर झाले. त्यात लोकसभा निवडणूकीसाठी उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी १०४ सिल्लोड लतिफ पठाण, तर टपाली मतपत्रिकांची देवाण घेवाण करण्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पुरस्कार जाहिर झाला आहे. तर उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे तत्कालिन संचालक राहुल तिडके व दयानंद कांबळे यांना जाहिर झाला आहे.
0 Comments