एस.एन.डी. ही शैक्षणिक संस्था राजकारण विरहित शैक्षणिक गुणवत्तेवर भर- बाबाराजे देशमुख

नातेपुते (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील पालकांना अजून कॉन्व्हेंट स्कूलची शिस्त माहीत नाही परंतु आपला पाल्य जेवढ्या कडक शिस्तीमध्ये शिक्षण घेईल तेवढा तो चांगला घडत जातो आणि देशाचा सुजाण नागरिक बनण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होते. पालकांनी शिस्तीला वाव दिला पाहिजे. शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा चांगला असल्याने चार वर्षातच शाळेला सीबीएसई ची मान्यता मिळाली आहे. एस.एन.डी. ही शैक्षणिक संस्था राजकारण विरहित असून शैक्षणिक गुणवत्तेवर भर दिला जात असल्याचे मत एस.एन.डी.शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथील एस एन डी इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
[ स्वरगंधा ४.० ] विद्यार्थ्यांचे नृत्य व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती ' जाणता राजा ' हे महानाट्य या घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, सुचित्रादेवी देशमुख, श्रुतिका देशमुख,धैर्यशील देशमुख, अमरशील देशमुख, नाथाजीराव देशमुख, नगराध्यक्षा अनिता लांडगे,उपनगराध्यक्ष अतुल पाटील, नातेपुते पोलीस ठाण्याचे सपोनी महारुद्र परजणे, अॅड.शिवाजीराव पिसाळ,महेश शेटे, उद्योजक अतुल बावकर, रणवीर देशमुख, रोहित शेटे, विश्वजीत पिसाळ, शक्ती पलंगे उपस्थित होते. यावेळी नर्सरी क्लास ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवरती नृत्य सादरीकरण केले तसेच इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती ' जाणता राजा ' हे महानाट्य सादरीकरण करून समोर बसलेल्या प्रमुख पाहुणे व पालकांची मने जिंकली. कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप पानसरे यांनी केले असून आभार स्कूल मॅनेजर शकूर पटेल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी काम पाहिले.
मालोजीराजे देशमुख चेअरमन एस.एन.डी.स्कूल, नातेपुते
0 Comments