Hot Posts

6/recent/ticker-posts

योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींचा शिलामंदिर लोकार्पण सोहळा भक्तिभावात

 योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींचा शिलामंदिर लोकार्पण सोहळा भक्तिभावात




सोलापूर(कटूसत्य वृत्त):- होटगी मठाचे तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या
पुण्याराधनानिमित्त जगदगुरू, श्रीशैल जगदगुरू, काशी जगदगुरू, काशी नूतन जगदगुरू यांच्या अमृत हस्ते  व बृहन्मठ होटगी मठाध्यक्ष परमपूज्य चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली परमपूज्य तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची शिलामूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण, शिलामंदिर लोकार्पण सोहळा शिवाचार्यवृंद व हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला.सोमवारी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे उभय जगदगुरूंच्या सान्निध्यामध्ये धर्मसभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात वेदघोष व प्रार्थना गीताने करण्यात आली. स्वागतपर मनोगत माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केले. त्यानंतर प्रास्ताविक प्रभू सारंग देव स्वामीजींनी केले. प्रारंभी श्री बृहन्मठ होटगी मठाकडून श्रीमद्उज्जैनी, श्रीमद् श्रीशैल, श्रीमद् काशी, श्रीमद काशी नूतन जगदगुरू आपल्या महास्वामीजींनी आशीर्वाचनातून तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या कार्याचा गुणगौरव केला. जगदगुरूंचे व शिवाचार्य गणांचे माहेरघर म्हणजेच श्री बृहन्मठ होटगी मठ आहे, असे गौरवोदगार काढले.यांचा बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य शिवाचार्य स्वामीजींकडून गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. त्यानंतर होटगी मठाधिपती चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य स्वामीजींना प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी परिवाराकडून पूर्ण अहेर, शाल, श्रीफळ, सोन्याची अंगठी घालून सत्कार करण्यात आला. तदनंतर उपस्थित शिवाचार्य व अतिथी मान्यवरांचा होटगी मठाकडून यथोचित सन्मानपूर्वक सत्काराबरोबरच होटगीतील विशेष धुरंदर सेवा पुरस्काराने सन्मानित करण्या भक्तांना आले. शिवाचार्य गणांच्या धर्म संदेशानंतर उज्जैनी जगदगुरू सिध्दलिंग राजदेशीकेंद्र योगिराजेंद्र तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य होत. श्रीमद् उज्जैन, श्रीमद्श्री शैल, श्रीमद् काशीपीठांच्या कार्यामध्ये श्री बृहन्मठ होटगी मठाचे कार्य अनन्यसाधारण आहे. वीरशैव धर्माच्या अष्टावरणाच्या प्रसाराबरोबरच सिध्दांत शिखामणी विषयी भक्तगणांमध्ये श्रध्दा, भक्ती निर्माण करून धर्म प्रचार व तपोरत्नं शिवाचार्य महास्वामींचे कार्य म्हणजे भक्तगणांवर माता-पिता सारखे प्रेम केले, भक्तगणावर संस्कार, अन्नदासोह, ज्ञान सेवा देण्यासाठी शिक्षण संस्था, निराधार भक्तगणांना अभय देणारे महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र प्रदेशातील एकमेव शिवाचार्य म्हणजेच प्रसार करण्याचे महान कार्य केले. शेवटी श्रीमद् काशी जगदगुरूंच्या आशीर्वचनानंतर कार्यक्रमाची सांग जगदगुरू पंचारतीने करण्यात आली. त्यानंतर सुमारे २१०० महिलांचा ओटी भरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाचार्यवृंद, सर्व पदाधिकारी व असंख्य भक्तगणांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित सर्वच भक्तांना महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील हजारो भक्तगण मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते.


Reactions

Post a Comment

0 Comments