Hot Posts

6/recent/ticker-posts

थकीत मिळकतकर वसुलीसाठी टप्प्याटप्प्याने होणार कारवाई

 थकीत मिळकतकर वसुलीसाठी टप्प्याटप्प्याने होणार कारवाई




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मिळकतकराची टप्प्याटप्प्याने थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका
कारवाई करणार आहे. पुढील वर्षांच्या सुरुवातीला थकबाकीदारांची यादी प्रसिध्द केली जाईल.
त्यानंतर थकबाकीदारांच्या दारात हलगीनाद करण्यात येईल. शेवटचा पर्याय म्हणून टाळी वाजवतील, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.महापालिकेचे मागील व चालू वर्षाचे मिळून सुमारे ७५० कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट आहे. थकीत कराचे प्रमाण मोठे असल्याने
महापालिकेने शनिवार, १४ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे तृतीयपंथीयांची मदत घेण्यात आयोजन केले होते. मालमत्ता कर विभागातील २४ हजारांपैकी ५ हजार ४६ इतक्या व्यक्तींनी सहभाग नोंदवित १३ कोटी ९४ हजार ४६६ रुपयांचा  मिळकतकर भरला. आता महापालिकेकडून कर  वसुलीची कारवाई टप्प्याटप्प्याने करण्याचे  तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात कराची थकीत असलेल्या २५ मिळकतींवर टाच आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असेही लोकरे यांनी सांगितले.
  जानेवारीत बड्या थकबाकदारांची नावे होम मैदान तसेच शहराच्या मुख्य चौकात डिजिटल बोर्डावर
लावण्यात येतील. त्यानंतरदेखील मिळकतदारांनी कर न भरल्यास फेब्रुवारीमध्ये त्यांच्या घरासमोर
हलगीनाद यालाही करण्यात येईल.मिळकतदारांनी प्रतिसाद न दिल्यास मार्चमध्ये तृतीयपंथीय थकीत येईल. थकीत मिळकतदांच्या घरासमोर ते टाळी वाजवतील,असेही आशिष लोकरे यांनी सांगितले.
मिळकतदारांचे नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता सील करणे,काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
महापालिकेची ही कटू कारवाई टाळण्यासाठी मिळकतदारांनी लवकरात लवकर थकीत कर
भरावा. तसेच करासंदर्भात काही हरकत व तक्रार असल्यास  महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही लोकरे यांनी  केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments