सामाजिक संस्थांना प्रेरणा निधी प्रदान
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- येथील नीलकंठ बँकेचे संस्थापक विश्वनाथ करवा यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त नीलकंठ को- ऑपरेटिव्ह बँक आणि करवा परिवाराच्यावतीने शहरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रेरणा निधी धनादेश प्रदान करण्यात आला. बँकेच्या सभागृहात संस्थापक अध्यक्ष करवा यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री मार्कंडेय सोलापूर रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्या हस्ते सामाजिक कार्य करणाऱ्या राजस्थानी विकास मंडळास २१ हजार रुपये आणि पर्यावरण रक्षक प्रवीण तळे यांना २५ हजार रुपये प्रेरणा निधीचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन मंजूषा गाडगीळ यांनी केले तर आभार कौस्तुभ करवा यांनी मानले. याप्रसंगी स्व. करवा यांच्या पत्नी नंदा करवा, निकिता कौस्तुभ करवा, नीलकंठ बँकेचे अध्यक्ष विजयकुमार उपाध्ये, उपाध्यक्ष सी. ए. धनराज नोगजा, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, वांधकाम व्यावसायिक नीलकंठ बँकेचा उपक्रम को-ओकलिल विश्वन अंकुर पंधे, किशोर चंडक, पवन सोनी, सूत व्यापारी संघाचे अध्यक्ष यल्लप्पा येलदी, राजस्थानी विकास मंडळाचे अध्यक्ष माणिकचंद डागा,सदस्य विजय जाजू, अॅड. नितीन हवीव, नीलकंठ बँकेचे संचालक जमनादास भुतडा, चंद्रकांत तापडिया, शरद कालाणी, सी.ए आनंद झंवर, नंदा भट्टड, सचिन कोठारी, महेश बँकेचे संचालक असीम सिंदगी, तुळशीदास भुतडा आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments