Hot Posts

6/recent/ticker-posts

नीरा देवधर धरणाचे अपूर्ण काम पूर्ण करणेबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन

नीरा देवधर धरणाचे अपूर्ण काम पूर्ण करणेबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन





नातेपुते (कटूसत्य वृत्त):- १५० कोटी जो निधी सदर योजनेस मिळालेला आहे. तो निधी खर्ची पडून ही अद्याप योजना अपूर्ण आहे. आपण जातीने या योजना पूर्ततेकडे लक्ष देऊन नीरा देवधर धरणाचे अपूर्ण काम पूर्ण करणेबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर काम पूर्ण करणे बाबत नीरा देवधर पाणी संघर्ष समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष नानासाहेब राणे यांनी निवेदन दिले आहे. यावेळी या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे की,नीरा देवघर धरण हे सन २००० साली बांधून पूर्ण झालेले असून पूर्ण क्षमतेने भरले जात आहे. तथापि त्या वरील कॅनॉलची कामे अपूर्ण असल्यामुळे लाभार्थी गावांना व लाभार्थी रयत जनतेला अद्याप ते पाणी मिळालेले नाही. सदर योजना लाभार्थी गावक्तरिता नवसंजीविनी देणारी आहे. लाभार्थी गावातील कायमस्वरूपी असणारा दुष्काळ संपणार आहे. सदरची लाभार्थी शेतकरी रयत त्या पाण्यामुळे सुखी व समृद्ध होणार आहे. तो भाग व तो परिसर अद्यापही मागासलेला राहिलेला आहे. आज अखेरच्या लोकप्रतिनिधी यांनी हवे तेवढे लक्ष न दिल्याने ही योजना दुर्लक्षित राहिली व लाभ क्षेत्रात नसलेल्या भागांना जाणूनबुजून ते पाणी दिले जात आहे. लाभार्थी गावावर फार मोठा अन्याय व अत्याचार या भागातील लोकप्रतिनिधी व मायबाप सरकारने केला असा या भागातील रयत जनतेचा समज झालेला आहे.
 महाराष्ट्राच्या विकासाचे एक व्हीजन आहे एक उत्तम स्वप्न आहे. तेव्हा खंडाळा जि. सातारा, फलटण जि. सातारा आणि माळशिरस जि. सोलापूर या भागातील त्या योजनेवरील सर्वच लाभार्थी गावे व रयत जनतेची नम्र विनंती आहे सदरची योजना अपूर्ण असून सदर योजनेकरीता लागणारा आर्थिक निधी आपण तातडीने भरीव असा मंजूर करावा.

गरज पडल्यास सदरची योजना ही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना या योजनेमध्ये खास बाब म्हणून मंजूर करून घ्यावी व या योजनेच्या लाभार्थी सर्व जिल्हे व तालुके यांना लवकरात लवकर न्याय आपल्या कारकीर्दीमध्ये मिळावा अशा आशयाचे निवेदन नानासाहेब राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments