विद्यानिकेतन प्रशालेत क्रीडा महोत्सवास प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 18, 2024

विद्यानिकेतन प्रशालेत क्रीडा महोत्सवास प्रारंभ

 विद्यानिकेतन प्रशालेत क्रीडा महोत्सवास प्रारंभ 




मसले चौधरी (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्यानिकेतन प्रशालेस क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.तर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विद्यार्थी खेळाडू शपथ घेऊन प्रामाणिकपणे व खेलाडू वृत्तीने स्पर्धा पार पाडण्याची शपथ घेतली.
        या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत  100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे,400 मीटर धावणे, रिले, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी,खोखो कबड्डी, क्रिकेट, रस्सीखेच व इतर मनोरंजनाचे खेळ असे विविध प्रकारचे खेळ घेतले जाणार आहेत असे क्रीडा शिक्षक शिवानंद बोधले यांनी सांगितले.
    या स्पर्धेत पंच म्हणून नागनाथ धुमाळ, रविकांत साबळे, सौ कांचन पवार, गजानन पाटील, अंजना पोटरे काम पाहणार आहेत.
   याप्रसंगी शहाजी आतकरे, गोविंद जांभळे संतोष वाघमोडे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages