Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रेडाई सोलापूर शाखेतर्फे प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन


 

 क्रेडाई सोलापूर शाखेतर्फे प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन 




 सोलापुरात शुक्रवारी उद्घाटन ; यंदाच्या प्रदर्शनात सुमारे 65 स्टॉल्स् उपलब्ध 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रेडाई सोलापूर तर्फे  प्लॉट,फ्लॅटस्, रो हाऊझेस् , बिल्डिंग मटेरियल  सप्लायर्स , वित्तीय संस्था इत्यादीचे प्रदर्शन यंदा दि. २० ते २३ डिसेंबर दरम्यान नॉर्थ कोट हायस्कुल मैदान येथे आयोजीत  करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष  अभय सुराणा यांनी पत्रकार परिषदेत दिली.                या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता  महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले  यांच्या हस्ते क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनिल फुरडे यांच्या अध्यक्षतेखाली व कोठारी पाईप्सचे व्यवस्थापकीय संचालक उज्वल कोठारी,  क्रेडाई नॅशनलचे  सभासद व शाखा  विस्तार समितीचे चेअरमन शशिकांत जिड्डीमनी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
        सोमवार दि. २३ डिसेंबरपर्यंत दररोज  सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे.  क्रेडाई सोलापूर आयोजीत या प्रदर्शनाचे कोठारी प्ल्मबींग पाईप्स् हे प्लम्बिंग पार्टनर आहेत.यंदाच्या प्रदर्शनात सुमारे 65 स्टॉल्स् असून सोलापुरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉटस्,फ्लॅटस्, बंगलोज्, रो-हाऊसेस, कमर्शिअल कॉम्प्लेक्स् तसेच अनेक बिल्डिंग मटेरियल  सप्लायर्स , वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहिती ही मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक विरल उदेशी यांनी दिली. या प्रदर्शनात रविवार दि. २२ डिसेंबर रोजी क्रेडाई वुमन्स विंग व युथ विंग च्या वतीने  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अभय सुराणा यांनी केले आहे. 
         या पत्रकार परिषदेस क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष आनंद पाटील, सचिव  संतोष सुरवसे,  खजिनदार राजीव दिपाली आदी उपस्थित  होते.


Reactions

Post a Comment

0 Comments