Hot Posts

6/recent/ticker-posts

सूर्यवंशी यांच्या मृत्यूची निःपक्षपातीपने चौकशी करा - क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेची मागणी

 सूर्यवंशी यांच्या मृत्यूची निःपक्षपातीपने चौकशी करा - क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेची मागणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूची निःपक्षपातीपने चौकशी करण्यात यावी व संविधानाची विटंबना करण्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाज यांच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली. यावेळी  क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश पाटोळे,  प्रदेश युवा कार्याध्यक्ष गोविंद कांबळे, युवा नेते रोहित खिलारे, प्रवीण वाडे, आशिष परदेशी अनुप बायस, अभिषेक हाटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
   सुरेश पाटोळे यांनी सांगितले की, 'परभणी येथे १० डिसेंबरला  संविधान प्रतिकृतीची विटंबना एका समाजकंटकांकडून करण्यात आली होती . यानंतर तेथे   बंद पुकारण्यात आला होता.  पोलिसांनी  कोंबिंग  ऑपरेशन करत अनेक दलित तरुण आणि  महिला यांना  ताब्यात घेतले होते त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. या मध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या ३५ वर्षीय कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला   न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते .या न्यायालयीन कोठडीत सूर्यवंशी यांचा   मृत्यू झाला आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत.सध्या महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडवण्याचे काम काही समाज विघातक प्रवृत्ती करत आहेत. आज दिलेल्या या निवेदनाद्वारे  क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही अशी मागणी करत आहे,की  परभणी येथील    संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांना कडक शासन करण्यात यावे.सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूची निपक्षपतिपने चौकशी करण्यात यावी. व यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना कायद्याप्रमाणे योग्य ती शिक्षा करण्यात यावी.'


Reactions

Post a Comment

0 Comments