बार्शी येथे वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा संपन्न
बार्शी (कटूसत्य वृत्त):- काल वृक्ष संवर्धन समिती बार्शीच्या वृक्ष संवर्धन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मधुकर डोईफोडे हे होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साई संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉ राहुल मांजरे पाटील लायन्स क्लब बार्शी रॉयल च्या अध्यक्षा सौ.वर्षा खांडवीकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.गौरी रसाळ,एस आर एम अकॅडमीचे शेख सर, हेल्थ क्लब बार्शीचे भगवान लोकरे, माधवबाग हॉस्पिटलचे संचालक डॉ.पवन कोळी उद्योजक सुनील झालटे, प्राणी मित्र ललित वस्ताद,गोरक्षक धन्यकुमार पाटवा तसेच वृक्षप्रेमी पक्षीप्रेमी सर्प मित्र आणि वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वृक्ष संवर्धन समितीच्या या वर्षीच्या टी-शर्ट किट चे पण उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मधुकर डोईफोडे सर यांनी वृक्ष संवर्धन समितीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच वृक्ष पक्षी प्राणी अशी जैवविविधता या पर्यावरण रक्षणासाठी किती महत्त्वाची आहे हे त्यांनी आपल्या शैलीत सांगितले. यावेळी डॉक्टर राहुल मांजरे,सौ.वर्षा खांडवीकर,सौ गौरी रसाळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृक्ष संवर्धन समिती चे अध्यक्ष उमेश काळे यांनी केले.शेवटी उदयकुमार पोतदार यांनी उपस्थिताना वृक्ष संवर्धनाची शपथ दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल तावरे, राणा देशमुख, संदीप पवार, अक्षय भोईटे,योगेश गाडे, दीपक जाधव,उमेश नलवडे, विष्णू भोसले,गणेश कदम,डॉ.सचिन चव्हाण,रोहन अवताडे महेश बकशेट्टी,सायरा मुल्ला, सुनीता गायकवाड,वीरेंद्र बंडे, आनंद धुमाळ,मोहम्मद शेख,बाबासाहेब बारकुल, चंद्रकांत उलभगत,देविदास अडसूळ,अनमोल वाघमारे,गणेश घोलप,प्रवीण गटकुळ,सागर बिडवे,बुगडे सर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतीकांत हामणे यांनी केले तर आभार सुधीर वाघमारे यांनी मानले.
0 Comments