शेतकऱ्यांनी लघु उद्योगजकाच्या माध्यमातून वाटचाल करावी- एकतपुरे
शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी माळीनगर, (ता.माळशिरस) येथे रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माळीनगर येथील केळीचे वेफर्स बनवणाऱ्या लक्ष्मी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित,रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषीकन्यांनी भेट दिली. त्यावेळी लक्ष्मी ऍग्रोचे मॅनेजर विष्णू एकतपुरे यांनी उत्पादन संदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करून व शेत उत्पादनातील केळी या पिकावरती माहिती सांगून उत्पादन कशा पद्धतीने वाढेल व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण लघु उद्योग करून आपले उत्पन्न वाढवू शकतो याबद्दल सविस्तर चर्चा केली. लघु उद्योगातून देशाच्या विकासाचा पाया मजबूत करा. देशातील लघुउद्योग विकास व्हावा अशी इच्छा सगळ्यांच्या मनात असली पाहिजे या उद्योगाचे स्वरूप बदलले पाहिजे लघु उद्योगाचा विकास होऊन तो देश विकासाचा पाया बनवा. यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी.नलवडे, कार्यक्रम व समन्वय प्राध्यापक. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम.चंदनकर आणि प्रा. एच. व्ही.कल्याणी यांचे विशेष सहकार्य लाभले त्यावेळी कृषी कन्या सोनाली गायकवाड, ईशा घोगरे, स्नेहल तांबोळकर, प्राची जाधव, प्रतीक्षा बनसोडे, जिजाऊ बर्डे, कोमल लाड,प्रतीक्षा हेगडे व प्रणाली यादव. आणि तेथील कर्मचारी व शेतकरी वर्ग उपस्थित राहिले होते.
0 Comments