Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी शिक्षण संस्थेत तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेचे थाटात उदघाटन

 नेताजी शिक्षण संस्थेत तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेचे थाटात उदघाटन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय संस्कृती जगात सर्व श्रेष्ठ संस्कृती आहे . भारतीय संत महात्म्याने उच्च विचारसरणी जगाला प्रदान केली आहे. भारतीय धर्म संस्कृतीतून आत्ताच्या युवा पिढीने धडा घ्यावा.भारतीय संस्कृती टिकून ठेवण्याची जबाबदारी युवा पिढीवर आली आहे असे प्रतिपादन संभाजीनगरचे युवा वक्ते , ख्यातनाम किर्तनकार अविनाश भारती यांनी केले.ते नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना अविनाश भारती बोलत होते. 'भारतीय संस्कृती व आजची तरुणाई' '  हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

तत्पूर्वी तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन वक्ते अविनाश भारती,संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, खजिनदार ललिता कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, धर्मराज बळ्ळारी, लक्ष्मीकांत त्रिशुले आदी मान्यवरांच्या हस्ते करुन व्याख्यानमालेचे उदघाटन करण्यात आले.
पुढे भारती म्हणाले,संत माहात्म्यांचे शिकवण, भारतीय चाली रिती, रुढी परंपरा,नाते गोते,देव धर्म  सण उत्सव, या विषयाला स्पर्श करताना अविनाश अशोक भारती यांनी भारतीय संस्कृती ही आजच्या तरुणाईने जपली पाहिजे हे सांगताना लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या  तुफानातले दिवे. च्या ओळी उदृत केल्या.  दिव्याचे महत्त्व अंधारातच कळते हे त्यांनी सांगितले. भारताचे महत्त्व सांगत असताना त्यांनी अटल बिहारी बाजपेयी यांनी भारताबद्दल व्यक्त केलेल्या भावना सांगितल्या. 
ऑटो रिक्षा चालकापासून पायलट पर्यंत स्त्रियांनी मारलेले मजल व मिक्सर रिपेरी पासून अंतराळवीरापर्यंत घेतलेली झेप ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्त्रियांना अशा सामान संधी मिळाल्या असे त्यांनी सांगितले .
जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा वो भारत देश है मेरा, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत गाऊन त्यांनी श्रोत्यांमध्ये चैतन्य पसरवले. मातृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव याचे महत्त्व त्यांनी यावेळी भारताच्या प्रगतीत असल्याचे सांगितले.भारती हे अधुनमधून विनोदात्मक बोली भाषेतून,ओगवत्या वाणीतून सहजपणे चिमटा काढत होते. यामुळे हास्याचे फवारे उडत होते.महाराष्ट्राच्या मातीतला स्पष्ट व बहारदार आवाजाने शब्दात शब्द, वाक्यात वाक्य गुंफत समाज प्रबोधन केल्याने श्रोतेगण व्याख्यानाचा मनमुराद आनंद घेतला.यावेळी प्रा.विजयकुमार बिराजदार, प्रा.धर्मराज कारले, प्रा.नागेश नकाते प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह संस्थेच्या प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर शितलकुमार पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळ -नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेत आयोजित तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेचे उदघाटन करताना संभाजीनगरचे युवा वक्ते अविनाश भारती, संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, ललिता कुंभार,सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार , मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, लक्ष्मीकांत त्रिशुले, धर्मराज बळ्ळारी व अन्य .


Reactions

Post a Comment

0 Comments