Hot Posts

6/recent/ticker-posts

तिवाडी यांच्या अन्नपूर्णा मिठाई नमकीनचे दुबई ट्रिप च्या लकी ड्रॉ चे निकाल जाहीर

 तिवाडी यांच्या अन्नपूर्णा मिठाई नमकीनचे दुबई ट्रिप च्या लकी ड्रॉ चे निकाल जाहीर




निलोफर बागवान व सनी ठेंगील या अन्नपूर्णा मिठाई नमकीन च्या भाग्यवान ग्राहकाला दुबई ट्रिपचे बक्षीस

सोलापूर - अन्नपूर्णा मिठाई नमकीन हे मागील ४२ वर्षांपासून हायजेनिक आणि दर्जेदार मिठाई, नमकीन देण्यामध्ये अग्रेसर असून या लकी ड्रॉ द्वारे एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला दुबई टूरला पाठविण्यात येत असल्याचे मत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर लक्ष्मीनारायण राठी, चिल्ड्रन स्पेशालिस्ट यांनी व्यक्त केले.

विजापूर रोड येथील मयूर मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आम्रपाली ब्युटीशियनचे प्रमुख श्यामजी सोनी व नंदकिशोर तिवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. अन्नपूर्णा मिठाई नमकीनचे रक्षाबंधन ते दिवाळी पाडवा पर्यंत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ चे नियोजन करण्यात आले होते.

यामध्ये प्रमुख करून रुपये ५०,००० खरेदीवर दुबई ट्रिपचे दोन कुपन, २०  हजार रुपयाच्या खरेदीवर दोन पाच ग्रॅमच्या सोन्याच्या नाणी आणि पाच हजार रुपयांच्या खरेदीवर दहा ग्रॅम चांदीचे शंभर नाणी अशी योजना आखलेली होती. त्याला सोलापूर शहर व परिसरातील ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

दुबई ट्रिप लकी ड्रॉ मध्ये निलोफर बागवान आणि  सनी ठेंगील हे भाग्यवान विजेते ठरले. तर दोन सोन्याच्या नाणी नागार्जुन कोर्माकुल आणि सौरभ माने या भाग्यवान विजेत्यांना देण्यात आल्या तसेच शंभर चांदीचे दहा ग्रॅम चे नाणी देखील यावेळी वितरित करण्यात आले.

रक्षाबंधन ते दिवाळी पाडवा अशा या लकी ड्रॉ योजनेला सोलापूर शहर व परिसरातील ग्राहकांनी नेहमीप्रमाणे प्रचंड प्रतिसाद दिला असल्याने नंदकिशोर तिवाडी यांनी मनापासून आभार मानले.

ही योजना यशस्वी व्हावे म्हणून तिवाडी यांच्या अन्नपूर्णा मिठाई नमकीन चे मॅनेजर शैलेश बजाज, सचिन खानापुरे, नागेश पुला, योगेश उपासे तसेच सर्व स्टाफ ने प्रयत्न केले.


 दुबई ट्रिप चे भाग्यवंत विजेते निलोफर बागवान यांना रिसीट देताना अन्नपूर्णा नमकीनचे नंदकुमार तिवारी प्रमुख पाहुणे डॉक्टर लक्ष्मीनारायण राठी, श्यामजी सोनी, सचिन खानापुरे

Reactions

Post a Comment

0 Comments