डोळ्यात चटणी टाकून दीड लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या तीन आरोपींना टेंभुर्णी पोलिसांनी 24 तासाच्या आत केले अटक
टेंभुर्णी पोलिसांच्या या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
-माढा तालुक्यातील मोडनिंब येथील मोडनिंब ते आष्टी जाणारे पालखी मार्गावर रेल्वे ब्रिज खाली दोन अनोळखी चोरट्यांनी मोटर सायकलवरून फिर्यादी सचिन जाधव, शेती विषयक औषध विक्रेता यांस अडवून २५ नोव्हेंबर रोजी रात्री ०९:३० वाजता मोटरसायकल थांबवुन त्याचे डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन व हातातील चार अंगठ्याा प्रत्येकी अर्धा तोळ्याची एकूण दोन तोळे व चांदिची अंगठी असा एकुण १,६०,५००/- रू. मुददेमाल या फिर्यादीस दमदाटी करून जबरदस्तीने काढून घेतले होते. त्याबाबत फिर्यादी सचिन संजय जाधव यांनी फिर्याद दिल्याने टेंभुर्णी पोलीस ठाणेस गु र नंबर 734/2024 भारतीय न्याय संहित कलम 309(4),3(5) प्रमाणे दि २६ नोव्हेंबर २०२४ रेाजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपास कामी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी पोलीस ठाणे कडील डिबी पथकाचे अंमलदार यांना गुन्हा उघडकिस आणण्याकरीता व गोपनीय माहिती काढण्याकरता मोडनिंब येथे पाठवले होते.
त्यानुसार पोलिस अंमलदार यांनी मोडनिंब येथील फिर्यादीचा मित्र धीरज जाडकर रा. मोडनिंब यास फिर्यादीचे अंगावर नेहमी सोने असते व तो रात्रीचे वेळी खताचे दुकान बंद करून जात असतो अशी माहिती होती त्यामुळे त्यांनी चोरी करण्याचा प्लॅन केला होता अशी माहिती काढली होती.
त्यानुसार धीरज अशोक जाडकर यांने त्याचा मित्र १) तुषार राजेंद्र जंगम (वय-२०) २) स्वप्निल बाळासाहेब स्वामी (वय-२४) दोघे रा. बार्शी यांना दिनांक 25/11 /2024 रोजी मोडनिंब येथे बोलावून घेऊन त्यांनी त्यांचे मित्रांना फिर्यादी सोने काढून घेणे बाबत सांगितले होते त्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्यानुसार फिर्यादी हा त्याचे खत दुकानातून मोडनिंब येथून मोटर सायकलवर निघाले ची माहिती आरोपी नंबर ३) धीरज अशोक जाडकर रा. मोडनिंब यांनी दिल्याने नमूद दोन बार्शी येथील आरोपींनी फिर्यादीचे मोटरसायकल आडवून त्याचे डोळ्यात चटणी टाकून फिर्यादीचे जवळील चार सोन्याच्या अंगठ्या व एक सोन्याची चैन व एक चांदिची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली होती
वरील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यानी गुन्ह्याची कबुली दिली असल्याने गुन्ह्याची कामे १) तुषार राजेंद्र जंगम (वय-२०) रा. पंकज नगर बार्शी २) स्वप्निल बाळासाहेब स्वामी (वय-२३)रा. भिसे प्लॉट बार्शी ३) धीरज अशोक जाडकर (वय-२७) रा. मोडनिंब यांच्यासह तिघांना अटक दिनांक २७ नोव्हेंबर२०२४ रोजी अटक करून माननीय जी व्ही गांधे , प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी माढा यांच्या समक्ष हजर केले असता त्यांची दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत पोलिस कस्टडी घेतली होती.
पोलीस कस्टडी दरम्यानचे तपासात सदर गुन्ह्याचे कामे आरोपींनी स्प्लेंडर मोटरसायकल वापरली होती गुन्हा केल्यानंतर बार्शी येथे निघून गेले होते.
यातील अटक आरोपी यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्याची चैन, चार सोन्याच्या अंगठ्याा, व एक चांदीची अंगठी असा एकूण १,६०,५००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्याचे कामे वापरण्यात आलेली मोटरसायकल व बार्शी येथून घरातून आणलेली चटणी जप्त करण्यात आली आहे
सदरचा गुन्हा २४ तासाच्या आत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी करमाळा, अजित पाटील, टेंभुर्णी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे ,डी, बी पथकाचे पोलीस उप निरीक्षक कुलदीप सोनटक्के ,सपोफौ विलास रणदिवे,पोलीस हवालदार विनोद साठे, विलास नलावडे, संदीप गिरमकर, पोलीस नाईक प्रवीण साठे, पोलीस हवालदार गणेश जगताप,सुहास देवकर,असिफ आतार, हर्षद वाघमोडे व दप्तरी पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद अनभुले या अंमलदार यांनी हा गुन्हा उघडकीस आणून या चोरीचा चोवीस तासात तपास करुन आरोपींना ताब्यात घेण्यात यश टेंभुर्णी पोलिसांना आल्यांने सर्व स्तरातून टेंभूर्णी पोलिसांनचे कौतुक होत आहे.
0 Comments