Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस भाजपा सदस्य अभियानाचा बचेरी गावात शुभारंभ

 माळशिरस भाजपा सदस्य अभियानाचा बचेरी गावात शुभारंभ




नातेपुत (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदस्य अभियान सुरू करण्यात आले असून देशभर सदस्य नोंदणी अभियान व ओळखपत्र तयार करण्याचा कार्यक्रम आखला असून या कार्यक्रमाची सुरुवात माळशिरस तालुक्यातील  बचेरी या गावापासून करण्यात आली बचेरी या ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये विधानसभेला केलेल्या मतदाराचे आभार व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा च्या वतीने बंडू यादव व मल्हार गोडसे यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य के के पाटील किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे नगरसेवक आकाश सावंत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवराज पूकळे गणेश पाटील संजय देशमुख रामभाऊ गोरड गणेश देशमुख गणेश गोडसे अण्णासो पाटील आदी मान्यवरउपस्थित होते यावेळी बोलताना के के पाटील यांनी भारतीय जनता पार्टी सरकारने गेल्या पाच वर्षाच्या कामाची ची माहिती दिली व लाडकी बहीण योजना शेतकरी सन्मान योजना दुष्काळ निधी आदी योजना प्रभावीपणे राबवल्याने तालुक्यातील सर्व सामान्य जनता भाजपकडे वळण्याची सांगितली यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी निरादेवधरच पाणी तालुक्यातील बावीस गावांना आणण्यासाठी प्रयत्न करणार आणि हे काम भारतीय जनता पार्टीच करू शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी शिवराज पोकळे गणेश पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती
Reactions

Post a Comment

0 Comments